
सुनगाव येथील प्राचीन राम मंदिर पुलाचे आमदार श्री. संजय कुटे आणि खासदार श्री. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन
डॉ कुलदीप सिंह राजपूत यांच्या प्रयत्नांना यश
जळगांव जामोद:- प्रतिनिधी
तालुक्यातील
सुनगाव येथील बऱ्हाणपूर रोडवरील प्राचीन राम मंदिरला जाण्यासाठी नदी मधून
रस्ता असल्यामुळे अनेक अडथळे येत होते.या पार्श्वभूमीवर माताजी संस्थान आणि राम मंदिराचे अध्यक्ष प्रा. डॉ. कुलदीपसिंह दर्यावसिंह राजपूत यांनी राम मंदिरापर्यंत पूल बांधण्यात यावे यासाठी जळगांव जामोद मतदारसंघाचे आमदार श्री. डॉ. संजय कुटे यांच्याकडे पाठपुरावा केला. आमदार श्री. कुटे यांनी राम मंदिरापर्यंत जाण्यासाठी पूल – बंधारा बांधण्यासाठी २ कोटी ९८ लक्ष रुपये मंजूर केले आहेत. आमदार श्री. संजय कुटे आणि खासदार श्री. प्रतापराव जाधव यांच्या शुभहस्ते या पुलाचे भूमिपूजन काल पार पडले. या प्रसंगी या मंदिराचे अध्यक्ष प्रा. डॉ. कुलदीपसिंह दर्यावसिंह राजपूत आपल्या मनोगतात म्हणाले की, पूल-बंधारा बांधण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे, त्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे. आमदार श्री. संजय कुटे यांनी तत्काळ या कामास मंजुरी मिळवून दिली आणि आता भाविकांची सोय होणार आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.यावेळी सूनगाव येथील सरपंच माजी जि. प. सदस्य माजी पंचायत समिती सदस्य व गावकरी उपस्थित होते













