
मध्यप्रदेशच्या सीमेवर सोनाळा पोलिसांची मोठी कारवा..
चार देशी पिस्टल व 17 जिवंत काडतुसे सह चौघांना अटक
प्रतिनिधी:-
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीतील निमखेडी फाट्याजवळ देशी पिस्टलचा व्यवहार करतांना पोलिसांनी चौघांना रंगेहाथ पकडल्याची घटना काल 18 एप्रिल 2024 रोजी घडली. त्यांच्याजवळून 4 देशी पिस्टल व 17 जिवंत काडतुसासह एकूण 2 लाख 17 हजार 370 रूपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौघांना आज संग्रामपूर न्यायालयात हजर केले असता 4 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 निःपक्ष आणि भयरहीत वातावरणात पार पडाव्या, यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून खबरदारीच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या सोनाळा, तामगांव व जळगांव जामोद पोलिस स्टेशन हद्दीमध्ये देशी बनावटीचे अग्नीशस्त्र ( पिस्टल), काडतुसे व ईतर हत्यारांची तस्करी, खरेदी विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार 18 एप्रिल रोजी सोनाळा पोस्टेचे सपोनि. चंद्रकांत पाटील प्रभारी अधिकारी, पोहेकॉं. विनोद शिंबरे, विशाल गवई, मोहिनुद्दीन सैय्यद, पोकॉं. राहूल पवार, गणेश मोरखडे, चालक पोहेकॉ विनायक इंगळे यांच्या पथकाला शिवारात ग्राम पचोरी येथून काही लोक येणार असून ते ईतर लोकांसोबत देशी बनावटीच्या पिस्टलची डिल (व्यवहार) करणार आहेत अशी गोपनीय खबर मिळाली. गोपनीय माहितीवरुन वसाडी ते हडीयामाल या ठिकाणी सापळा रचून, यातील निमखेडी फाट्याजवळ 04 इसमांना रंगेहाथ पकडण्यात आले. पकडण्यात आलेला आरोपीमध्ये भारसिंग मिसऱ्या खिराडेव रा. पाचोरी ता. खकनार जि. बुरहानपुर (म.प्र.), हिरचंद गुमानसिंग उचवारे रा. पाचोरी ता. खकनार जि. बुरहानपुर (म.प्र.), आकाश मुरलीधर मेश्राम रा. करुणानगर, बालाघाट (म.प्र.) व संदिप अंतराम डोंगरे रा. आमगांव, ता. बालाघाट जि. बालाघाट (म.प्र.) यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांचेजवळून देशी बनावटीचे 04 नग अग्नीशस्त्र ( पिस्टल) मॅग्झीनसह प्रत्येकी 30 हजार रुपये प्रमाणे 1 लाख 20 हजार रुपये., 17 नग जिवंत काडतूस किं. 8 हजार 500-रुपये, तीन मोबाईल फोन किं. 16 हजार 500 रुपये, नगदी 32 हजार 370 रुपये व एक मोटार सायकल किं. 40 हजार रुपये असा एकूण 2 लाख 17 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल.जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी उपरोक्त आरोपीविरूध्द पो.स्टे. सोनाळा येथे कलम 3/25 अग्नी शस्त्र कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींना आज 19 एप्रिल रोजी संग्रामपूर न्यायालयात हजर केला 4 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सदर गुन्ह्यातील ईतर आरोपीतांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीचा शोध घेणेकरीता पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्था. गु.शा. बुलढाणा यांचे नेतृत्वामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे, तसेच पो.स्टे. सोनाळा यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. चंद्रकांत पाटील प्रभारी अधिकारी पो.स्टे. सोनाळा करीत आहेत.सदरची कामगिरी सुनिल कडासने- पोलीस अधीक्षक बुलढाणा, अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक खामगाव, बी.बी. महामुनी अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, डी. एस. गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली सोनाळा पोलिस ठाणेदार चंद्रकांत पाटील यांस सह पथकाने केली.













