
खामगांव:- येथील रायगड कॉलनी भागातील ब्राम्हण सभा मंगल कार्यालयजवळ डी पी रोड येथील सेवानिवृत्त प्राध्यापक यांच्या बंद घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खामगांव शहर पोलिसांनी प्रा शिक्षकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राजेंद्र समाधान पाटील वय (62 )सेवानिवृत्त प्रा यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली की,,मी पत्नीसह मुला व मुली कडे बाहेरगावी गेलो असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घराचा दरवाज्याचे कड़ी कोंडा व कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये लोखंडी कपाटातील नगदी, सोन्या चांदीचे दागिने असा एकुण 46000/- रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. अशा तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द कलम 454,380 भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो हे का गजानन पाटील हे करीत आहेत.













