श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये इंग्लिश लिटरडे असोसिएशन कार्यकारिणीचे (अभ्यास मंडळाचे) गठण.
जळगाव जामोद:- प्रतिनिधी
आज दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी शैक्षणिक सत्र 2024 25 करिता इंग्रजी अभ्यास मंडळाचे गठन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेततील रुची वाढून आजच्या जागतिकीकरणाच्या काळात इंग्रजी भाषा व साहित्याचा अभ्यास करून भाषेवर प्रभुत्व निर्माण होण्याच्या दृष्टीने या अभ्यास मंडळाचे गठन, इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक गिरीश कुलकर्णी व सहकारी प्रा. प्रदीप चव्हाण आणि रामेश्वर सायखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शैक्षणिक सत्र 2024 25 मध्ये इंग्रजी भाषा कौशल्य, संवाद कौशल्य ,साहित्य अभ्यास ,व्यक्तिमत्व विकास, इंटरव्यू स्किल्स यासारखे विविध उपक्रम घेण्याचे ठरले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन आणि व्यवस्थापन योग्य रीतीने होण्यासाठी खालील प्रमाणे विद्यार्थ्यांच्या सहभागातून अभ्यास मंडळाची कार्यकरणी गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष वैष्णवी दाभाडे, उपाध्यक्ष अजय सोळंके, सचिव योगेश राखोंडे, सहसचिव वैष्णवी खेडकर, कोषाध्यक्ष पल्लवी माकोडे ,प्रसिद्ध प्रमुख नेहा मांडवकर व रोहित इंगळे, तसेच सदस्य वैभव घुले, राहील शहा, शिवाजी वारे, प्रफुल्ल धनोकार, अजय मोरे ,चैताली अहिर ,सुषमा तेल्हारकर, शितल राऊत, वैष्णवी धामोळे,कोमल वानखडे, वृषाली कुलकर्णी ज्ञानेश्वरी सोनवणे नेहा वानखडे प्रतीक्षा कुंनगडे या विद्यार्थ्यांचा कार्यकारणी समावेश करण्यात आला कार्यकारणीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पदाला अनुसरून विविध कामे व जबाबदाऱ्या संपवण्यात आल्या. प्रा. कुलकर्णी यांनी कार्यकारणीतील सर्व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.














