Home बुलढाणा ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना डिजिटल साक्षरता मार्गदर्शन

ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना डिजिटल साक्षरता मार्गदर्शन

0
92

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय अंतर्गत दिनांक आठ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांकरिता डिजिटल साक्षरता या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे डिजिटल साक्षरता या विषयावर विद्यार्थ्यांकरता मार्गदर्शन करण्यात आले
महाविद्यालयाचे ग्रंथपाल संतोष कतोरे यांनी डिजिटल साक्षरते संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना ग्रंथालयात असलेल्या एनएसडीएल सुविधेबाबत व त्याच्या नोंदणी प्रक्रिये बाबत विद्यार्थ्यांना अवगत केले विद्यार्थ्यांनी एनएसडीएल वर आपली नोंदणी करावी त्यासाठी ग्रंथालयातर्फे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली असून नॅशनल डिजिटल लायब्ररी चा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग घ्यावा असे प्रतिपादिन केले नॅशनल डिजिटल लायब्ररी तर्फे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर आभासी पद्धतीने आपल्याला हवी असलेली माहिती प्राप्त होऊ शकते ती कशी प्राप्त करावी तसेच नॅशनल डिजिटल लायब्ररी चे फायदे डिजिटल साक्षरतेचे फायदे या सर्व विषयावर प्राध्यापक कतोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी कार्यक्रमाची आवश्यकता तसेच डिजिटल साक्षरता ही काळाची गरज असल्याची सांगितले आजच्या काळात मोठ्या प्रमाणात सर्वच व्यवहारांमध्ये डिजिटल व्यवहारांचा वापर वाढतो आहे परंतु त्याचबरोबर अनेक डिजिटल गुन्हे सुद्धा वाढत आहे आणि म्हणून सर्वांनी डिजिटल साक्षर असणे गरजेचे आहे असे सुद्धा सांगितले

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर गिरीश मायी हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक विनोद बावस्कर यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!