Home बुलढाणा सरकारी जमीन विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा पत्रकार देविदास तायडे यांची...

सरकारी जमीन विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा पत्रकार देविदास तायडे यांची मागणी

0
136

 

जळगांव जामोद. प्रतिनिधी
अमोल भगत

वायाळ शिवारातील ई क्लास जमिनीवर प्लॉटिंग पाडून अवैधरित्या प्लॉटची विक्री केल्या प्रकरणी संबंधित व्यक्ती वर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देविदास तायडे यांनी तहसिलदार यांचेकडे तक्रार व्दारे केली

नायब तहसीलदार महसुल यांचे कोर्ट जळगांव जा रा.प्र.क्र/एम.आर.सी.-८१/वायाळ/१६/२०२३-२४ विक्री परवानगी प्रकरण दाखल असता त्या मध्ये देविदास तायडे यांनी हरकत घेतल्याने स्वता भुमीधारी सिताबाई जाधव यांनी शेती सरकार जमा होण्याच्या भितीने विक्री परवानगी ९/१२/२०२४ ला अर्ज देऊन कोर्टातील प्रकरण रद्द केले
जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना ४ नोव्हेंबर ३०२४ ला पत्र व्यवहार केला आसता सिताबाई जाधव यांनी शेतजमीन शर्तभग केला या बाबतीत पुरावे दाखल नसल्याचे म्हटले त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी ई क्लास शर्तभग प्रकरण सुरु केले महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रकरणाला वेळ लागत असल्याने सरकारी जमीनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णया मुळे विक्री व्यवहार होत आहेत
जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात
भुमिधारी सिताबाई रामदास जाधव रा. वडशिंगी यांना मौजे वायाळ शिवारात शासकीय ईक्लास १३हे. ९३आर जमीन पैकी २हे. शेत जमीन अटी व शर्ती च्या नियमाने पट्टा मा. तहसिदार यांनी प्रदान केला होता.

नियम १९७१, नियम ४३ (१) (अ) मधील क्रमांक ४,५,६. निर्दे शीत केलेल्या शर्ती ला बाध्य राहील (अट) सदर शेती दुसऱ्या व्यक्तिला वहीतीसाठी देता येणार नाही. गहान ठेवू नये, विकूनये, अभिहस्तांकीत, हस्तांतरीत करु नये असे अतीक्रमण नियमाकुल करतांना तहसिलदार यांनी पट्टा प्रदान करतांना नियम व अटी लावून दिलेल्या आदेशात म्हटले आहे. लाभार्थी सिताबाई जाधव यांनी रफिक शाह रहेमान शाह रा. जळगांव जा. यांना दि. २०/०१/२०१५ रोजी १००रु च्या साध्या स्टॅम्पपेपरवर ९९ वर्षाचा भाडेपट्टयावर जमीन दिली. तर याच तारखेमध्ये दुसऱ्या १००रु च्या स्टॅम्पपेपरवर नोटरी विक्री करारनामार करुन दिला.

रफिक शाह यांच्या ताब्यात सन २०१४-१५ पासून शेत जमीन त्यांच्या ताब्यात आहे. सिताबाई जाधव यांनी त्या मोबदल्यात दहा लाख रुपयात विना परवानगी शासकीय जमीन भाडे पट्टयावर दिली.

भुमीधारी सिताबाई जाधव यांनी निमबाह्य ९९ वर्षाचा भाडेपट्टा व विक्री करार नामा लिहुन दिला. नंतर रफिक शाह यांनी शेतजमीन वर प्लॉट विनापरवानगी पाडून व्यक्तिगत प्लॉट नमुने आठ तयार करून खरेदीखत सन २०२२-२३-२४ या वर्षा मध्ये लाखो रुपयात प्लॉट विकले आज रोजी शेत जमीनवर पक्के घरे, दुकाने, गॅरेज बांधकाम आदी दिसत आहे. रसुलपूर ग्रामपंचायत ग्रामसेवक / सरपंच यांनी देलेल्या पत्रानुसार रफीक शाह रहेमान शाह यांच्या नावे ग्रा.प. नमुना आठ ला कोणत्याही नोंदी उपलब्ध नाही.

रफिक शाह यांनी खोट नाटे नमुना आठ तयार करून अनेक लोकांना खरेदी खत करून दिल्याचे दस्त आहेत. पटवारी यांनी शासकीय जमीनवर गैव्यवहार विनापरवानगी प्लॉट पाडून विक्री करीत असलेल्या व्यक्तिच्या व लाभार्थी यांच्या बाबत तहसिलदार यांना अहवाल दिला असता तर तसे प्रकार घडले नसते त्यामुळे या प्रकरणात पटवारीसुध्दा कामचुकारपना केल्याचे दिसते.

वरील प्रकरणाची सखोल चौकशी करुन भुमीघारी मालक, प्लॉट विकणारा, पटवारी, दुय्यम निबंधक यांच्यावर कार्यवाही करावी सिताबाई जाधव यांच्या नावे असलेली शेत जमीन शासन जमा करुन त्यांच्यासह रफिक शहा वर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात यावा दिनाक २६/१/२०२५ पर्यंत संबंधित व्यक्ती वर गुन्हे दाखल न केल्यास लोकशाही मार्गाने तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल याची दक्षता प्रशासनाचे अधिकारी या नात्याने आपल्यावर राहील असे निवेदनात म्हटले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!