Home बुलढाणा मराठी पत्रकार परिषद संलग्नित जळगाव जामोद पत्रकार संघ ची कार्यकारणी गठीत

मराठी पत्रकार परिषद संलग्नित जळगाव जामोद पत्रकार संघ ची कार्यकारणी गठीत

0
167

मराठी पत्रकार परिषद संलग्नित जळगाव जामोद पत्रकार संघ ची कार्यकारणी गठीत ..
अध्यक्षपदी देशोन्नतीचे विनोद चिपडे
तर सरचिटणीस पदी दै. मातृभूमिचे अश्विन राजपूत
यांची सर्वानुमते निवड

जळगाव जा.प्रतिनिधी अमोल भगत

शहरातील विश्रामगृह येथे दिनांक 17-01-2025 रोजी मराठी पत्रकार परिषद संलग्नित जळगाव जामोद तालुका पत्रकार संघ उभारणीसाठी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित
बुलढाणा जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली व प्रशांत देशमुख तसेच वसीम शेख दोन्ही कार्याध्यक्ष बुलढाणा जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ पत्रकार अनिल पाटील तसेच शाम तायडे यांच्या मार्गदर्शनात ही निर्वाचन प्रक्रिया पार पाडून यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांनी सामंजस्यातून व चर्चेतून एक मताने दैनिक देशोन्नती चे विनोद चिपडे यांची अध्यक्षपदी तर दैनिक मातृभूमिचे अश्विन राजपूत यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.

सर्वप्रथम या ठिकाणी रणजितसिंह राजपूत यांनी मराठी पत्रकार परिषद बद्दल सुरुवातीपासून इत्यंभूत माहिती दिली तसेच भविष्यात संस्थेच्या माध्यमातून करावयाची कामे पत्रकारांना समजून सांगितले. तसेच पत्रकारांसाठी सकारात्मक काम करण्यासाठी सर्वांनी सोबत येण्याचे त्यांनी आवाहनही केले.

त्यावेळी उपस्थित पत्रकारांमधून

उपाध्यक्षपदी संतोष कुलथे,

कार्याध्यक्ष पदी अमोल भगत,

सहसचिव पदी मनीष ताडे,
तालुका संघटक पदी मंगेश बहुरूपी,

तर सह संघटक पदी विजय वानखडे

यांची एक मताने निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थितांपैकी वरिष्ठ पत्रकार अनिल पाटील यांनी पत्रकार व त्यांच्या समस्या यावर मार्गदर्शन केले तसेच भविष्यात पत्रकार संघामार्फत पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी तालुका पत्रकार संघाकडून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी सर्वांनी प्रतिज्ञा घेत पत्रकार हितासाठी पूर्ण नेटाने झटण्याची प्रतिज्ञा केली .
यावेळी सभागृहात पत्रकार सर्वश्री गजानन सोनटक्के, संतोष कुलथे, अनिल भगत, प्रीतमसिंह ठाकुर, विनोद चिपडे, अमोल भगत, संदीप भावसार, अश्विन राजपूत, मंगल काकडे, मंगेश बहुरूपी, मनीष ताडे, श्याम तायडे, विजय वानखडे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अमोल भगत यांनी तर प्रास्ताविक प्रशांत देशमुख यांनी करत आभार वसीम शेख यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व पत्रकारांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!