बनावट मृत्युपत्र तयार करून शेतीचा मालकी हक्क स्वतःच्या नावे घेण्याचा प्रयत्न
संतोष ढगे यांचा आरोप
जळगाव जामोद:- प्रतिनिधी
अमोल भगत
संतोष किसन ढगे यांच्या तक्रारीवरून महम्मद शब्बीर महम्मद बशीर, यांनी त्यांच्या
आत्या नामे द्वारकाबाई विठु ढगे यांच्या मालकीची मौजे कहुपट्टा ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा येथील शेत गट नं.37 क्षेत्रफळ 8हे. ही शेतजमीन असुन माझ्या आत्या मयत झाल्या तेव्हा पासुन सदरहू शेती मी व माझे भाऊ वहित करीत आहे.
सदरहु शेती संदर्भात गैरअर्जदार याने खोटे व गैरकायदेशीर मृत्युपत्र बनवुन सदरहु शेतीचा मालकी हक्क स्वतःच्या नावाने गैरकायदेशीरत्या करुन घेण्याचा प्रयत्न करीत आहे व आम्हाला सदरहु शेतीमध्ये कास्तकारी करण्यास मनाई करीत आहे. परंतु मी काल दि. 12/01/2025 रोजी दुपारी 4.00 ते 5.00 वाजेच्या दरम्यान आमच्या शेतात पिकाची पाहणी करण्याकरीता गेलो असता गैरअर्जदार व त्याची सोबत 3-4 लोकांनी आम्हाला शेतात जाण्यास मनाई केली.
त्याबाबत आम्ही त्याला विचारणा केली असता त्याने आईबहिणीवरुन अश्लिल भाषेत शिवीगाळ केली व म्हणाला की, ये खेत मेरा है, तु अगर इस खेतमे आया तो तेरे हात पैर तोड दूंगा अशा धमक्या दिल्या व त्याने व त्याच्या सोबतच्या लोक मला मारण्यास धावले परंतु भी कसाबसा माझा जीव वाचवुन निघुन आलो.
गैरअर्जदार यांचा फारमोठा जोडजमाव असुन तो गुंडप्रवृत्तीचा व खुनशी स्वभवाचा दिसतो त्यांच्या पासुन मला व माझ्या परिवाराच्या जीवीतास धोका आहे यांची जबाबदारी प्रशासनाची राहील त्यामुळे त्याचेवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी तक्रारीतून केली आहे.














