Home बुलढाणा नांदुरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुरावस्था दूर करावी – सुरेश...

नांदुरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुरावस्था दूर करावी – सुरेश पेठकर

0
107

नांदुरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुरावस्था दूर करावी – सुरेश पेठकर

 

नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे :-

 

शहरातील मध्यवर्ती असलेल्या शहराची आन-बान शान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जवळपास सन १९८३-८४ मध्ये शहरातील मध्यवर्ती भागात तत्कालीन नगरपालिकेचे अध्यक्ष आता तहसीलदार श्री. दी. ना. रायपुरे व तत्कालीन मुख्याधिकारी श्री. वि. ह. गोरे यांनी बसवीलेला आहे शहरातील शिवभक्तांकरीता हा पुतळा आन-बान शान असून सदर पुतळा निर्मितीला आज जवळपास ४४ वर्ष झाले असून आतापर्यंत या पुतळ्याचे नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून साधे स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा करण्यात आले नाही पुतळ्याची आज फारच दुर्दशा व दुरावस्था झाली असून ही शहरवासी तसेच शिवभक्तांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.

 

 

 

याकडे शहरातील लोकप्रतिनिधी व स्वतःला शिवभक्त समजणारे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत, ही गंभीर बाब असून शहराच्या दृष्टिकोनातून भविष्यात यामुळे मौठा प्रसंग निर्माण होऊ शकतो याची नगरपालिका प्रशासनाने व लोकनियुक्त नगराध्यक्ष लोकप्रतिनिधी नगरसेवक यांनी दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे याकरिता शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिवभक्त नागरिक यांनी पुढाकार घेऊन नगरपालिका प्रशासनाकडून या ठिकाणी पुतळा बदलून त्या ठिकाणी त्याच जागेवर नव्याने अश्वारूढ पुतळा बसवून शहराच्या वैभवात व आन-बान शान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाची शान वाढेल.

 

 

 

अशी नांदुरा शहरातील सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असणारे ज्येष्ठ पत्रकार मुख्य संपादक स्वाभिमानी शिवसंदेश चे सुरेश दादा पेठकर नांदुरा यांनी गेल्या चार पाच वर्षापासून मुख्याधिकारी तथा प्रशासनाधिकारी नगरपरिषद नांदुरा यांना व वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा, उपविभागीय अधिकारी मलकापूर, तहसीलदार नांदुरा, पोलीस स्टेशन नांदुरा, पत्रकार संघ नांदुरा यांच्याकडे निवेदनाव्या माध्यमातून वेळोवेळी मांडून पाठपुराव्याचा प्रयत्न केला.

 

 

परंतु यासाठी शहरातील सर्वसामान्य शिवसैनिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी विविध संस्थेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी यासाठी मोठे आंदोलन करण्याचे आवश्यकता आहे जेणेकरून नगरपालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात दबाव निमर्माण होऊन त्या ठिकाणी आज असलेली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुरावस्था झालेली आहे त्यासाठी सठीनी एकत्र घेऊन या ठिकाणी मोठे अन आंदोलन उभारून या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री उक्पती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा निमर्माण व्हावा ही रास्ता अपेक्षा शहरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे याची दखल प्रशासनाने घ्याठी अशी मागणी करण्यात आली.

 

 

 

सदर निवेदन नांदुरा ठाणेदार श्री जयवत सातव यांना ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा पेठकर यांनी दिले यावेळी गोपनीय विभागाचे श्रीधर काळे व रवी भाऊ राठोड हे हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!