Home बुलढाणा श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयात हळदी कुंकू कार्यक्रमातून महिला सन्मान व सक्षमीकरनाचा जागर...

श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयात हळदी कुंकू कार्यक्रमातून महिला सन्मान व सक्षमीकरनाचा जागर !

0
75

श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयात हळदी कुंकू कार्यक्रमातून महिला सन्मान व सक्षमीकरनाचा जागर !

नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे :-

 

श्री.शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदुरा येथे महिला विकास केंद्र अंतर्गत रथसप्तमी दीना निमित्त दि. २५/१/२०२६ रोजी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 

 

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सौ. मंगलाताई मुऱ्हेकर, सौ. आशाताई गोंड, सौ. पाटील ताई सौ. भारती करमसिंग राजपूत उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अलका मानकर होत्या.

 

 

कार्यक्रमाची सुरुवात मां जिजाऊ, सावित्रीबाई फुले व देवी अहिल्याबाई होळकर यांच्या पावन प्रतिमेस अभिवादन व जिजाऊ बंदना करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ. राजपूत मंडम यांनी छत्रपती शिवराय यांच्या जडणघडणीत माँ जिजाऊंचा सिंहाचा वाटा कसा होता व स्वबळावर राज्यकारभार कसा चालविला यावर भाध्य केले.

 

 

तसेच त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर देखील प्रकाश टाकला. त्यांनी तळागाळातील स्त्रियांकरिता, मुलींकरिता शिक्षणाची दारे उघडून दिली. व भारताच्या पहिली महिला शिक्षिका झाल्या, तसेच देवी अहिल्याबाई होळकर यांचे पतिनिधनानंतर त्यांनी किती कौशल्याने संपूर्ण राज्यकारभार सांभाळले पावर देखील प्रकाश टाकला.

 

 

 

त्यानंतर नगराध्यक्ष सौ.मंगला मुऱ्हेकर यांनी स्त्री सक्षमीकरण ही काळाची गरज आहे आणि अश्या स्तुत्य उपक्रमाची समाजाला किती गरज आहे हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

 

 

सौ. आशाताई गोंड यांनी महिलांना बचतगटाविषयी मार्गदर्शन केले आणि स्त्रिया स्वकर्तुत्वाने कशा समाजात आपले स्थान निर्माण करू शकतात ह्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. संगीताताई अवचार यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. करमसिंग राजपूत यांनी वर्तमान परिस्थितीत स्त्रियांबर होणाऱ्या अन्यायावर प्रकाश टाकला व विधवा स्त्रियांना देखील समाजात इतर स्त्रियांप्रमाणे वागणूक मिळणे, सर्व पूजे-चर्चेत सामील करून घेणे व साधारण स्त्रियांप्रमाणे त्यांना वागणूक देणे इ. विषयावर त्यांनी भाष्य केले.

 

 

त्यानंतर एकल महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. अलका मानकर मॅडम यांनी तंत्रज्ञानाच्या, विज्ञानाच्या युगात देखील समाज अंधश्रध्देला कसा बळी पडत आहे, महिला सक्षम होण्याकरिता महिलांनी आर्थिक साक्षर होणे हि काळाची गरज आहे व मुलींना आपल्या पंखांमध्ये बळ येण्याकरिता, उंच भरारी घेण्याकरिता शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. माननीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनानंतर सर्व स्त्रियांना हळदीकुंकू व तिळगुळ देण्यात आले व प्रत्येक महिलेस बाण स्वरुपात एक रोपटे देऊन पर्यावरण पूरक व पर्यावरण वाचविण्याचा संदेश या कार्यक्रमांतर्गत देण्यात आला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनस्पतीशास्त्रविभाग प्रमुख डॉ. सूचिता दिघे यांनी केले. तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना महिला विकास समितीच्या संयोजिका डॉ. प्रतिमा न. आत्राम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ. स्मिता तराळे डॉ. सुचिता दिघे, प्रा. सुनंदा डेकाटे, प्रा. स्वाती कदम, प्रा. नेहा बावस्कर, प्रा. कविता उगले व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या आईनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!