Home बुलढाणा शिक्षण सभापती पदी निवड झाल्याबद्दल अशांतभाई वानखेडे यांचा सत्कार

शिक्षण सभापती पदी निवड झाल्याबद्दल अशांतभाई वानखेडे यांचा सत्कार

0
232

शिक्षण सभापती पदी निवड झाल्याबद्दल अशांतभाई वानखेडे यांचा हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार

मलकापूर शहर प्रतिनिधी किशोर सोनोने

नगरपालिका स्थायी समिती निवड प्रक्रियेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून पहिले निवडून आलेले अविरोध नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांची शिक्षण सभापती पदी निवड झाल्याबद्दल हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे न. प. शिक्षण सभापती दालनात त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

अशांतभाई वानखेडे यांनी शिक्षण सभापती पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर नगरपरिषद येथे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले .

 

 

 

 

 

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांनी पत्रकार संघाच्या वतीने अशांतभाई वानखेडे यांचा सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी सतीश दांडगे, प्रा प्रकाश थाटे, उल्हासभाई शेगोकार, नथुजी हिवराळे, डॉ.अशोक सुरडकर, हिंदी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तायडे, सुधाकर तायडे, कडू फुलपगारे, सय्यद ताहेर, प्रदीप इंगळे, आत्माराम मोरे, किशोर सोनवणे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!