महात्मा फुले पुतळा विटंबनेचा नांदुऱ्यात निषेध
सकल माळी समाजाचे तहसिलदारांना निवेदन निवेदन
नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे :
तेलंगणा राज्यातील विटंबना तेल्लापूर येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी केल्याच्या घटनेचा नांदुरा येथे ‘सकल माळी समाजा’च्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
या निंदनीय घटनेमुळे संपूर्ण बहुजन समाजात संतापाची लाट असून, तहसीलदारांमार्फत सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. महात्मा फुले हे देशाचे प्रेरणास्थान असून त्यांच्या स्मारकाचा अवमान होणे ही लोकशाहीसाठी शरमेची बाब आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच, महापुरुषांच्या स्मारकांना चोख सुरक्षा पुरवण्याची आग्रही मागणीही करण्यात आली असून, दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे याप्रसंगी सकल माळी समाजाचे अनेक निवेदक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.














