श्रीकृष्ण तायडे मलकापूर तालुका प्रतिनिधी :-
महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना समान अधिकार तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा अधिकार बहाल केला तर चवदार तळ्याचा सत्याग्रह हा मानवी मूल्यांचा व समतेचा संदेश देणारा ऐतिहासिक संग्राम असल्याचे प्रतिपादन शिक्षण सभापती तथा नगरसेवक भाई अशांत वानखेडे यांनी केले.
भिमनगर येथील त्रिरत्न बुद्ध विहार परिसरात हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, मलकापूर यांच्या वतीने आयोजित समता सप्ताह कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने समता सप्ताह जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावर आधारित पथनाट्य प्रयोग सादर करून समता व बंधुत्वाचा संदेश दिला. कार्यक्रमास मुख्याध्यापिका ममताताई पांडे उपस्थित होत्या.
या प्रसंगी शिक्षिका माया गाडे, वैशाली जोशी, समाजभूषण आत्माराम इंगळे, पत्रकार सतीश दांडगे, राजकन्या वानखेडे, संतोष वरखेडे, रितेश इंगळे यांच्यासह महिला प्रभाबाई महाले, कविता अजने,बबीता महाले, संगीता वाघोदे, वनिता महाले, गायकवाड, संगीता इंगळे, मोकळे, यासह विद्यार्थिनी प्रणिता कवडे , रत्ना फुलपगारे, संगीता दांडगे, प्रिया जंगले, खुशी पाटील, जानवी पांडे, प्रतिज्ञा इंगळे, या विद्यार्थिनीनी पथनाट्य सादरीकरण केले त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जोशी यांनी तर आभार प्रदर्शन राजकन्या वानखेडे यांनी केले तर विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.














