Home बुलढाणा डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांची २७१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांची २७१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

0
23

श्रीकृष्ण तायडे मलकापूर तालुका प्रतिनिधी :-

होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन, मलकापूर तर्फे डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांची २७१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

 

जागतिक होमिओपॅथी दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी होमिओपॅथी उपचार पद्धतीचे महत्व अधोरेखित केले. होमिओपॅथी ही सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक उपचार पद्धती असून आजच्या युगात तिचे महत्व अधिक वाढत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच डॉ. हनिमन यांनी दिलेल्या या अमूल्य उपचार पद्धतीमुळे समाजाला मोठा लाभ होत असल्याचे सांगण्यात आले.

 

 

कार्यक्रमादरम्यान डॉक्टरांनी होमिओपॅथीबाबत जनजागृती करण्याचा संकल्प केला. तसेच रुग्णसेवा हीच खरी सेवा मानून अधिकाधिक लोकांपर्यंत होमिओपॅथी पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.डॉ हनिमन ह्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर असोसिएशन च्या आगामी काळातील काही उपक्रमाबाबतीत तपशील मांडण्यात आला.

 

 

 

या कार्यक्रमास होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ विजय राणे, उपाध्यक्ष डॉ सुहास खंगार, सचिव डॉ योगेश पटणी, कोषध्यक्ष डॉ वैभव डवले, डॉ जीवन महाजन, डॉ चेतन सोनवणे, डॉ मधुकर चौधरी, डॉ मुकेश केला, डॉ कृष्णा वाघ, डॉ मुकेश केला, डॉ बाठे, डॉ ज्ञानेश देशपांडे, डॉ अनिल पाटील, डॉ विवेक डागा, डॉ शुभम डागा, डॉ भारती केला, डॉ मीनल वानखेडे, डॉ स्वीकृती गोयणका, डॉ वैभवी दोषी समवेत सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन डॉ योगेश पटणी ह्यांनी केले..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!