Home बुलढाणा क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

0
24

नांदुरा येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
भव्य मोटरसायकल रॅलीने सुरुवात

 

 

 

 

 

 

 

नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे : सामाजिक क्रांतीचे जनक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी नांदुरा शहरात विविध कार्यक्रमांसह भव्य मोटरसायकल रॅली काढून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यानंतर शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. हातात फलक, बॅनर आणि महापुरुषांचे फोटो घेऊन “महात्मा फुले अमर रहें”, “शिक्षणाचा प्रसार करा” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. रॅलीमुळे शहरात उत्सवी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.या प्रसंगी मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यश भैय्या संचेती, भाजप नेते श्री.सुधीरभाऊ मुऱ्हेकर, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, नगरसेवक श्री.अनिल जांगळे, नगरसेवक रामसिंग ठाकूर, शहराध्यक्ष प्रमोद हिवाळे,सुनिल तांदळे, नगरसेवक लालाभाऊ इंगळे,विनोद वानखडे, ब्रह्मानंद चौधरी,अनिल इंगळे,अमोल डहाके,राजुभाऊ पालकर,सोनू चोपडे,पियूष सराफ,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मान्यवरांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समाजात शिक्षण, समता आणि बंधुता वाढविण्याचे आवाहन केले.
एकूणच, नांदुरा शहरात क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त काढण्यात आलेली भव्य मोटरसायकल रॅली आणि विविध कार्यक्रमांमुळे उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!