नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने शेगाव रेल्वे स्टेशनवर थंड पाणी, बिस्कीट व शरबत वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.रविवार, १३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी शेगाव प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर हा कार्यक्रम पार पडला प्रवाशांना या उपक्रमाचा लाभ देण्यात आला. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला.
या कार्यक्रमाला स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे, सीनियर इंजिनियर विजयकुमार राजूरकर, संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा दीपमाला कांबळे तसेच ज्येष्ठ पत्रकार गणेश असोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपमाला कांबळे, नीरज खंडेलवाल,उमेश अग्रवाल, नंदगोपाल पांडे गणेश आसोरे,, सौ शारदा गणेश, उमाताई बोचरे, सॊ.कल्पना भयानी, नीरज खंडेलवाल, सॊ.सीमा पांडव, सौ ज्योती बावस्कर, सोम्या पाहूजा, संजय कांबळे, गणेश मोरे, सौ रुपाली घाडगे, सौ ज्योती बावस्कर सह अनेकांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले तसेच शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक श्री मोहन देशपांडे यांनी सहकार्याच्या भावनेतून सर्वांना मार्गदर्शन करून सहकार्य केले.














