Home बुलढाणा बोगस व कमी वजन असलेल्या अल्ट्राटेक सिमेंटचा पुरवठा करनाऱ्या चा भांडा फोड

बोगस व कमी वजन असलेल्या अल्ट्राटेक सिमेंटचा पुरवठा करनाऱ्या चा भांडा फोड

0
147

 

जळगांव जामोद मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल…बोगस सिमेंटच्या बँगचा अनेक दुकानदारांना माल पुरवल्याचा संशय…

जळगांव जामोद(प्रतिनिधी):-

जळगांव जामोद मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल…बोगस सिमेंटच्या बँगचा अनेक दुकानदारांना माल पुरवल्याचा संशय…

जळगांव जामोद  तालुक्यामध्ये येत असलेल्या सुनगांव गावांमध्ये बोगस व कमी वजन असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट बँगाचा भंडाफोड झाल्याने खामगाव येथील एका व्यक्तीवर स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे…

सुनगाव येथील रहिवासी असलेल्या गिताबाई बैस यांचे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतुन घरकुलाचे बांधकाम सुरू असुन गिताबाई बैस याचा मुलगा राजेंद्रसिंह लोकेंद्रसिंह बैस यांने खामगाव येथील शेख सलीम या सिमेंट विक्रेत्यांनी अल्ट्राटेक कंपनीचे बोगस व कमी वजनाचे सिमेंट विक्री केल्याने राजेंद्र बैस यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे व पोलिसांनी दि 25 डिसेंबरला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीवरून राजेंद्रसिंग लोकेंद्रसिंग बैस (२५) रा. सुनगाव ता.यानी येथील पोस्टेला तक्रार दिली की, त्याच्या घराचे बांधकाम सूनगाव येथे सुरु असून त्यानी याकरीता खामगाव येथून शेख सलीम शेख जलील (४५) रा. ताजनगर याच्यामार्फत अल्ट्राटेक कंपनीच्या ३०० बॅग सिमेंट घेतले . हे सिमेंट वापरुन त्यानी घराचे काही बांधकाम केले असता सिमेंट बोगस असल्याचे त्याच्या लक्षात आले. १० ते १२ दिवस बांधकाम झालेले असुन त्या बांधकामात लोखंडी खिळे सहज जात आहे. तसेच भिंती पोकळ झाल्या आहेत. तसेच सिमेंटच्या बोरींची पॅकिंग ही वरील पॅकिंग ही पिवळ्या धाग्याने व खालीलपैकी पांढऱ्या धाग्याने केलेली आहेत याबाबत त्यांना संशय आला असता त्यांनी सिमेंट थैलीचे मोजमाप केले तर त्यांना 2 ते 8 किलो मोजमापात कमी आढळले याबाबत राजेंद्र बैस याने सिमेंट पुरवठादार शेख सलीम याला विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. सिमेंट विक्रेत्याने अल्ट्राटेक कंपनीच्या सिमेंटचे पॅकिंग स्वतः करून त्यामध्ये बोगस सिमेंट भरले आहे असा त्यांना संशय आला त्यामुळे त्यांनी येथील पोलिसात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीवरून स्थानिक पोलीस स्टेशनचे एपीआय पांडुरंग इंगळे, पीएसआय शशिकांत दोडके, पो कॉ सचिन राजपूत,समाधान शिंगणे यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला व १०० बँग अल्ट्राटेक सिमेंट व ४०७ वाहन क्रमांक एम एच १२ एक्यु ६८५२ हे जप्त करण्यात आले आहे.फिर्यादी राजेंद्र बैस यांच्या तक्रारी वरुन पोलिसांनी शेख सलीम शेख जलील याच्याविरोधात कलम ४२० भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकांत दोडके हे करीत आहेत.

सदर सिमेंट विक्रेत्याने तालुक्यातील अनेक बिल्डिंग व मटेरियल सप्लायर्स यांच्या दुकानात सिमेंट पुरवल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अशा बोगस सिमेंट विक्रेत्याची सुध्दा कसून चौकशी होणे व कार्यवाही होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!