Home बुलढाणा आंतरराज्यीय मोटार सायकली चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

आंतरराज्यीय मोटार सायकली चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

0
105

 

जळगांव जामोद (प्रतिनिधी):-

४२ दुचाकीसह २१ लाखाचा मुद्देमाल जप्त

बूलढाणा जिल्हयामध्ये होणाऱ्या मोटार सायकल चोरीच्या अनुशंगाने सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक, बुलढाणा. अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक, खामगांव. बि. बी. महामुनी अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा. यांच्या सूचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदारांचे विशेष पथक स्थापन करुन मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे अशोक लांडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे नेतृत्वामध्ये पथक स्थापन करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कारवाई सुरु होती.

सदर पथकाने अभिलेखावरील आरोपी तपासुन तसेच गोपनिय बातमीदार कार्यान्वीत केले. दरम्यान पथकास मिळालेल्या माहिती वरुन ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे १) शत्रुघ्न रामचंद्र सोळंके वय २८ वर्ष रा. पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद ह.मु. रिधोरा ता. मोताळा जि बुलढाणा ,२) गंगाराम इकराम पावरा वय २० वर्ष रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव ,३) तुळशीराम इकराम पावरा वय २४ वर्ष रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव ,४)सिताराम लेदा मुझाल्दे वय २४ वर्ष, रा. शिरवेल महादेव ता. भगवानपुरा जि. खरगोन मध्यप्रदेश.

यांच्या ताब्यातुन विविध कंपनीच्या एकुण ४२ दुचाकी, किंमत अंदाजे २१ लक्ष रुपये त्यात महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हयातील ०६, जळगांव जिल्हयातील ०९, नाशिक जिल्हयातील ०४, मध्यप्रदेश राज्यातील १६ व ७ मोटार सायकलीचा कोणताही पुरावा मिळुन आला नाही. आर.टी.ओ. कार्यालयाकडून माहिती मिळविण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदर आरोपी हे निर्जन स्थळी पार्क केलेल्या मोटार सायकल चोरायचे व त्या कमी पैशात बाहेर राज्यात… तसेच बाहेर राज्यामध्ये चोरलेल्या महाराष्ट्रात विक्री करायचे.

स्थानिक गुन्हे शाखेतील पथकास मिळालेल्या माहितीवरून दिनांक १५/१२/२०२३ रोजी आरोपी नामे शत्रुघ्न रामचंद्र सोळंके वय २८ वर्ष रा. पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद ह.मु. रिधोरा ता. मोताळा हा विना कागदपत्राची मोटार सायकल विक्री करीता मोताळा परिसरात फिरत आहे. अशा गोपनिय माहितीवरुन त्यास ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातील मोटार सायकलचा अभिलेख पाहीला असता जळगांव जामोद येथील ग्राम वडशिंगी येथून सदरची मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

सदर बाबत पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी नामे शत्रुघ्न यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता मोटार सायकल चोरीच्या रॅकेट मध्ये २)गंगाराम इकराम पावरा, वय २० रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव, ३) तुळशीराम इकराम पावरा वय २४ वर्ष, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव व ४)सिताराम लेदा मुझाल्दे, वय २४ वर्ष, रा. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, जि. खरगोन राज्य मध्यप्रदेश हे देखील मोटार सायकल चोरी व विक्री मध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.

सदर आरोपीच्या ताब्यातुन तपासामध्ये एकूण ४२ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून त्यात महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा, जळगांव, नाशिक तसेच मध्यप्रदेशातील मोटार सायकल चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. चारही आरोपीना तपास दरम्यान अटक करण्यात आली.

तर तपास जळगांव जामोद पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर व पोलीस अंमलदार उमेश शेगोकार हे करीत आहेत. आरापी १ ते ३ यांना जळगांव जामोद येथील न्यायालयात हजर केले असता तपासाचे गांर्भीयता पाहता न्यायालयाने त्यांना दिनांक २१/१२/२०२३ पावेतो पीसीआर दिला आहे. आरोपी क्रमांक ५ यास दिनांक २०/१२/२०२३ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरीची कामगिरी सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक बुलडाणा,अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बि. बी. महामुणी, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक एन लांडे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या नेतृत्वात नंदकिशोर काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोळंके, सपोनि, श्रीकांत जिंदमवार पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार रामविजय राजपूत, दशरथ जूमडे, दिपक लेकुरवाळे, दिगंबर कपाटे, जगदेव टेकाळे, गणेश पाटील, पुरूषोत्तम आघाव, अनंत फरतडे, दिपक वायाळ, मनोज खर्डे, चालक पोलीस कॉन्स्टेबल विलास भोसले, सुरेश भिसे, सायबर पोलीस स्टेशनचे राजु आडवे, अमोल तरमळे, संदीप शेळके व योगेश सरोदे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!