Home बुलढाणा केंद्र शासनाच्या नवीन ट्रान्सपोर्ट कायद्याविरुद्ध ड्रायव्हर आक्रमक

केंद्र शासनाच्या नवीन ट्रान्सपोर्ट कायद्याविरुद्ध ड्रायव्हर आक्रमक

0
149

 

जळगांव जामोद(प्रतिनिधी):-

केंद्र शासनाने केलेल्या नवीन ट्रान्सपोर्ट कायद्या नुसार आता एक्सीडेंट झाल्यास रुपये दहा लाख दंड करण्याचा तसेच सात वर्षाची सक्तशिक्षा चा हा नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे.

हा निर्णय संपूर्ण ड्रायव्हर चालक मालक यांच्यावर अन्यायकारक असून ज्यामुळे आमच्या उपजीविकेवर परिणाम होऊन उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे केंद्र शासनाने घेतलेला निर्णय हा अन्यायकारक आहे.

सदर निर्णय हा तत्काळ मागे घेण्यात यावा अन्यथा संपूर्ण ड्रायव्हर मालक-चालक संघटनेच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, वाहतूक बंद ठेवण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार हे केंद्र शासन राहील.

अशा प्रकारचा निवेदन  उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे डायमंड ट्रान्सपोर्ट च्या वतीने सय्यद जुनेद जावेद, आकाश वानखडे, दिलीप दाभाडे, अब्दुल साजिद समीर खान, सय्यद कबीर अब्दुल मोहसीन यांच्यासह शेकडो ड्रायव्हर निवेदन देताना उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!