Home बुलढाणा महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ उपाध्यक्ष पदी प्रसेनजीत पाटिल यांची अविरोध निवड.

महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ उपाध्यक्ष पदी प्रसेनजीत पाटिल यांची अविरोध निवड.

0
137

 

जळगाव जामोद:- प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मुंबई निवडणूक 7 जानेवारी 2024 रोजी पार पडली त्यानंतर 9 जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीत ओबीसी मतदारसंघातून संपूर्ण राज्यातून झालेल्या मतमोजणी मध्ये प्रसेनजीत पाटिल यांनी भाजपा मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय चंद्रकांत बाविस्कार यांचा दारुण पराभव केला. या निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 8, राष्ट्रीवादी (शरदचंद्र पवार ) पार्टीचे 4, राष्ट्रवादी (अजित पवार ) पार्टीचे 4 व भाजपा 1 असे संचालक मंडळ निर्माण झाले. दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड झाली महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वांत जास्त 8 संचालक असल्याने त्यांना अध्यक्ष पद तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाला उपाध्यक्ष पद ठरले. त्यानुसार काँग्रेस आमदार तथा संचालक कुणाल पाटिल हे अध्यक्ष पदी तर राष्ट्रवादी नेते प्रसेनजीत पाटिल यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवडी नंतर जळगाव जामोद येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. जल्लोष वेळी शिवसेना(उबाठा) सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटिल,शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन वाघ,राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्ह्याध्यक्ष एम.डी.साबीर, शहराध्यक्ष रमेश ताडे,राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते करीम खान,कॉटन मार्केट संचालक विष्णू आटोळे, जिल्हा सरचिटनीस मोहसीन खान, सोशल मिडिया प्रदेश सचिव आशिष वायझोडे, विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे, खरेदी विक्री अध्यक्ष अजहर पटेल,मुशताक भाईजान, शहर कार्याध्यक्ष सिद्धार्थ हेलोडे, पवन वाघ,संकेत रहाटे, दादाराव धंदर,वसीम पटेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!