Home बुलढाणा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात कला व ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन. 

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात कला व ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन. 

0
140

 

 

जळगाव जामोद:- प्रतिनिधी

 

स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात गृह अर्थशास्त्र विभाग व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने हस्तकला

व ग्रंथालया अंतर्गत विविध पाककला पुस्तकांचे आयोजन करण्यात आले आजच्या प्रदर्शनीचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी

प्राचार्य डॉक्टर प्रवीण डाबरे सर तर प्रदर्शनीच्या उद्घाटिका सौ मीनाताई डिडोळकर तसेच जळगाव शिक्षण मंडळाच्या संचालिका सौ गायत्री विप्रदास, जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव श्री मिलिंदजी जोशी, अधीक्षक श्री संजय गाडेकर सर , प्रोफेसर डॉक्टर गिरीश मायी सर, प्रोफेसर डॉक्टर ऋषिकेश सर, ग्रंथपाल संतोष कतोरे सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. या प्रदर्शनीचे आयोजन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे तसेच रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करून त्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा हा मुख्य उद्देश होता. अभ्यासक्रमांतर्गत मुलींनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करून त्या प्रदर्शनीत ठेवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विविध आजारावर आहार आयोजन ,चार्ट, स्क्रॅपबुक ठेवण्यात आले.तसेच मायक्रोम साहित्य ,वॉलपीस ,फोटो फ्रेम, ठसे काम पेंटिंग ,देवाची वस्त्र, जुन्या कपड्यांपासून पायदान, झुंबर, मोत्यांपासून रांगोळी ,फुलं, तोरण,क्रोशा काम,शिवणकाम ड्रेस ,ब्लाऊज,प्लास्टिक चमच्यांपासून ख्रिसमस ट्री, दहीहंडी यासारख्या विविध वस्तू प्रदर्शनी ठेवण्यात आल्या. याचबरोबर ग्रंथप्रदर्शनी पण ठेवण्यात आली .यामध्ये ग्रंथालयात उपलब्ध असलेले पाककलेवर आधारित पुस्तके जसे विविध भाज्या, कोशिंबिरी, चटण्या,विविध मिठाई ,बिर्याणी चे प्रकार असे निरनिराळे पुस्तक प्रदर्शनात ठेवण्यात आले. त्याशिवाय शिवणकाम,भरतकाम, क्रोशा काम,विणकाम ,स्त्रीआरोग्य यासारखी पुस्तके ग्रंथ प्रदर्शनीत ठेवण्यात आली.या ग्रंथ प्रदर्शनीचा उद्देश ही सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपलब्ध आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणे तसेच नवनवीन पाककला व कलाकुसर त्यांच्यात निर्माण व्हावी हा होता.या प्रदर्शनीत महाविद्यालयाचे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू ,भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील तीनशे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रदर्शनीत आपली उपस्थिती दर्शविली. तसेच या प्रदर्शनी मध्ये गृह अर्थशास्त्र विभागाच्या एकूण 30 मुलींनी सहभाग घेतला होता. उपस्थित मान्यवरांनी मुलींचे कौतुक केले व त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले .तसेच त्यांना त्यांच्या कार्यात यशस्वी होण्याकरिता शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रोफेसर डॉक्टर गिरीश मायी, प्रोफेसर डॉक्टर ऋषिकेश विप्रदास,ग्रंथपाल संतोष कतोरे,गृहअर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका सौ अर्चना जोशी, प्राध्यापिका कुमारी विमल कतोरे यांनी परिश्रम घेतले.तसेच श्री प्यारेलाल डाबेराव,सौ मानसी कुलकर्णी,योगेश तायडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!