Home बुलढाणा शिवजयंती उत्साहात साजरी

शिवजयंती उत्साहात साजरी

0
134

 

जळगाव जामोद :- प्रतिनिधी

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित व सातपुडा शिक्षण संस्था द्वारा संचालित स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव जामोद येथे दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई तसेच प्रा.अविनाश आटोळे व डॉ.अनिकेत उमाळे आणि प्रा.दत्ता तायडे (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) उपस्थित होते. यावेळी प्रा.योगेश गवई यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती का साजरा करतो त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे कार्य, तत्त्वज्ञान व त्यांचा आदर्श याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर कु.निकम या विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक कविता सादर केली व जय जगताप या विद्यार्थ्याने शिवाजी महाराज यांच्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.डवले या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व महाविद्यालय व्यवस्थापन समिती, पदाधिकारी, प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे अमूल्य सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!