Home कृषी शेतकर्याच्या विविध मागण्यासंदर्भात शेतकरी नेते प्रसेनजीत पाटिल आक्रमक, तहसील कार्यालयाला ठोकले कुलुप

शेतकर्याच्या विविध मागण्यासंदर्भात शेतकरी नेते प्रसेनजीत पाटिल आक्रमक, तहसील कार्यालयाला ठोकले कुलुप

0
148

जळगाव जामोद :- प्रतिनिधी

जुलै 2023 मध्ये जळगाव जामोद, संग्रामपुर महापुरा मध्ये शेतकर्याच अतोनात नुकसान झाले. हजारो हेक्टर जमीन खरडून गेली, पिकांच नुकसान झाल. अश्या परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्यांना शासन, प्रशासनाने मदत मिळवून देण्यासंदर्भात प्रचंड आशा होत्या.

परंतु नुकसान झाल्यानंतर तब्बल जवळपास 8 महिन्यांनी नुकसानीच्या याद्या जाहीर झाल्या. त्यामध्ये ज्यांच खरोखर नुकसान झाले, जमिनी खरडून गेल्या त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला.

त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसेनजीत पाटिल यांच्या नेतृत्वात तसेच विविध पक्ष संघटना यांनी आंदोलने केली. त्यानंतर 8 दिवस आधी तहसील कार्यालयाने 1 नोटीस काढून तक्रारकर्त्या शेतकऱ्यांसाठी 15/2/2024 पासून महसूल मंडळ नुसार तक्रारी निवरण्यासाठी कॅम्पचे आयोयन केले.

आज 15 फेब्रुवारी ला वडशिंगी महसूल मंडळाला बोलावलेलं असतांना तहसीलदार यांच्यासह सर्व कर्मचारी गायब होते, शेकडो शेतकरी आले असतांना अधिकारी नसल्यामुळे शेतकरी प्रचंड आक्रोशात होते. अश्या परिस्थितीत शासन, प्रशासनाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते प्रसेनजीत पाटिल यांनी तहसील कार्यालयाला कुलुप ठोकले. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, वंचितचे सुनिल बोदडे, सुहास वाघ, अरुण निंबोळकर, आशिष वायझोडे, राजेश वाघ यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!