गावाच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही आमदार डॉ. संजय कुटे यांचे आश्वासनं
जळगाव (जा):- प्रतिनिधी
खेर्डा बुद्रुक या गावामध्ये सध्या फार राजकीय सलोख्याचे वातावरण आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती उमेदवारांना प्रचंड मताधिक्य मिळाले. त्यानंतर महायुतीसह वंचित एकत्र येऊन ग्रामपंचायतवर आपला झेंडा
फडकवला. सर्व गाव एक संघपणे महायुतीच्या सोबत राहले. गावच्या विकासासाठी २५ लाख रुपये निधी देऊ आणि त्यापुढे सुद्धा गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्र्वासन आमदार डॉ. संजय कुटे यांनी यावेळी दिले. खेर्डा बु. गावच्या नवनिर्वाचित सरपंच मनकर्णाबाई पिंपळकर यांच्या पदग्रहण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात (ता. १६) ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदचे माजीअर्थ बांधकाम सभापती राजेंद्र उमाळे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष रंगराव देशमुख, माजी सरपंच दिलीपशेठ राठी, बाजार समितीचे माजी सभापती एम.आर. वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष बाबुराम तायडे, भाजपाचे विधानसभा अध्यक्ष गजानन सरोदे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवीदास घोपे, शिवसेना शहर प्रमुख संजय भुजबळ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सर्व गावाने लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार ना. प्रतापराव जाधव यांना मताधिक्य
दिले, असेच मताधिक्य येणाऱ्या विधानसभेला सुद्धा सर्वांनी महायुतीचे उमेदवार यांना द्यावे, असे आव्हान यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष रंगराव देशमुख यांनी केले. नवनिर्वाचित सरपंच मनकर्णाबाई पिंपळकर यांनी आमदार डॉ. संजय कुटे यांचे हस्ते पदभार स्वीकारला. ह्याच औचित्यावर संजय निराधार योजनेचे माजी अध्यक्ष तथा माजी सरपंच जयप्रकाश तायडे यांनी आ. डॉ. संजय कुटे यांचे हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला.
आ. डॉ. कुटे यांनी त्यांचा भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकून सत्कार केला. शंकरराव उमरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर संचालन राधेश्याम जाधव यांनी केले. ह्या कार्यक्रमाला, रामभाऊ उमरकर, माजी सरपंच जयप्रकाश तायडे, गजानन मानकर, राधेश्याम जाधव, अनंता कराळे, सुपडा करांगळे, भाजप तालुका चिटणीस कैलास राजुरकर, ऋषिकेश देशमुख, जनार्धन वेरुळकर, मंगेश वेलकर, आशिष वेलकर, ग्रामपंचायत सदस्य महादेव म्हसाळ, प्रदीप मोरखडे, सुनील तायडे, विजय वानखडे, वासुदेव राजनकर, मंगेश टाकसाळ, राजु उज्जेनकर, अनिल निमकर्डे, गजानन म्हसाळ, उमेश वानखडे, प्रदीप वानखडे, अमोल गाळकर, नवल बोचरे, योगेश निमकर्डे, गजानन टाकसाळ, यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














