Home बुलढाणा वीज पडून पाण्याची टाकी कोसळल्याचा अफलातून जावाईशोध, ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न ...

वीज पडून पाण्याची टाकी कोसळल्याचा अफलातून जावाईशोध, ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न नागपूर च्या पथकाकडून आज चौकशी करूण स्थळ पंचनामा करण्यात आले.

0
108

वीज पडून पाण्याची टाकी कोसळल्याचा अफलातून जावाईशोध, ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न

 

नागपूर च्या पथकाकडून आज चौकशी करूण स्थळ पंचनामा करण्यात आले.

 

प्रतिनिधी संग्रामपूर..अमोल भगत :-

 

तालुक्यातील लाडणापूर ग्रा.पं.अंतर्गत आदिवासी भागातील चिचारी गावात जल जिवन मिशन अंतर्गत १ कोटी ७५ लाख रुपये मंंजुर या योजनेतून दीड लाख लिटर क्षमतेची पाणीपुरवठा टाकीचे बांधकाम पुर्णत्वाकडे जात असतानाच १२ जून रोजी रात्री अचानक टाकी कोसळून जमीनदोस्त झाली. निकृष्ट बांधकामामुळे टाकी कोसळल्याने संबंधित ठेकेदारासह दोषींवर कारवाई करण्याची मागणी येत आहे. मात्र गावातील काही मोजक्या लोकांनी वीज पडल्याने टाकी कोसळल्याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देऊन ठेकेदाराला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला असल्याचे दिसून येत आहे.

 

संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भागातील चिचारी गावात जल मिशन योजने अंतर्गत १ कोटी ७५ लाख रुपये खर्चाची दिड लाख लिटर क्षमतेच्या पाण्याचे टाकीचे बांधकाम सुरु होते . सदर हे बांधकाम जवळपास ९० टक्के होऊन पुर्णत्वास जात असतांना १२ जुन २०२४ रोजी रात्री अचानक टाकी कोसळली. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जिवितहानी झाली नाही व अनर्थ टळला. या घटनेमुळे प्रशासनात चांगलीच खळबळ माजली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारासोबत संगनमत करून फार मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांविरूध्द कारवाईची मागणी होत आहे. परंत्ुा आपले पाप झाकण्यासाठी गावातील लोकांना हाताशी धरुन वीज पडल्यामुळे पाण्याची टाकी कोसळली असल्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.वास्तविक पाहता पाण्याच्या टाकीचा पाया मजबुत नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. तर या ठिकाणी वीज पडल्याच्या कोणत्याही खाणाखुणा दिसत नाही. तर जाणकारांच्या मत्ो टाकीचा पाया गोल फर्माव्दारे जमिनीपासून कमीत कमी २० फूट खोल असावयास पाहिजे होता. परंतू तसे न झाल्यामुळेच पाया कमकुवत झाल्याने व निकृष्ट बांधकाम साहित्य वापरल्यानेच टाकी कोसळली असल्याचे बोलले जात आहे.

 

चौकट……

वीज पडल्याने टाकी कोसळली असती तर त्याठिकाणी वीज पडल्याची चिन्हे दिसली असती. परंतु तसे काही आढळून आले नाही. कुठेही डॅमेज किवा पाण्याच्या टाकीला तडा गेलेला नाही. टाकीचे बांधकाम सुरू झाल्यापासून कामाची गुणवत्ता तपासण्यात आला नाही. त्यामुळे निकृष्ट बांधकाम झाल्याने टाकी कोसळली, ही वस्तुस्थिती आहे. परंतू यामध्ये खालपासून वरपर्यंत अधिकाऱ्यांचे हात ओले झाले असल्याने ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित ठेकदार व अधिकाऱ्याविरूध्द कारवाई करण्यात यावी व चिचारी गावात नव्याने पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात यावे- अभयसिंह मारोडे, कृउबास संचालक, संग्रामपूर.

 

राकाँची कारवाईची मागणी- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना १४ जून रोजी निवेदन देण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे पाण्याची टाकी कोसळली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांविरूध्द कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष संजय मारोडे, पराग अवचार,प्रमोद सपकाळ,दत्ता डिवरे आदिंच्या सह्या आहेत.

 

ठेकेदाराच्या समर्थनार्थ निवेदन- चिचारी गावातील ८-९ लोकांची नावे व काहींच्या सह्या असलेले निवेदन तहसीलदार यांना देऊन ठेकेदाराला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. वीज पडल्यामुळे टाकी कोसळली असल्याचे निवेदनात नमूद करून नविन टाकी बांधून देण्याची मागणी करण्यात आली आहे. हे उल्लेखनीय.

 

 

चिचारी येथे नागपूर च्या पथकाकडून पाण्याच्या टाकीचे चौकशी करण्यात आली.

 

आज दि.१५ जून रोजी नागपूर येथील वरिष्ठ अधिकारी विंरेंद्र देड्डा यांनी पाहणी केली,तसेच कार्यकारी अभियंता राहुल जाधव, उपविभागीय अभियंता प्रतापराव थोरात यावेळी उपस्थित होते. तसेच् या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संग्रामपूर शाखा अभियंता यु.आर.कोरडे हे पण आज घटनास्थळी उपस्थित होते. प्राप्त माहितीनुसार असे कि,पाण्याच्या टाकीचे बांधकाम बाबात गतीने चौकशी सुरु असून अंतिम टप्प्यात माहिती उपलब्ध झालेली आहे. संबंधित विभागाकडून अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल यावेळी अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!