पानंद रस्ते घेणार मोकळा स्वास
शेत/पाणंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत थेट व बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार
मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजनेच्या मार्फत होणार अंमलाबजावणी
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
सध्या शेतकऱ्यांना सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न म्हणजे आपल्या शेतातील पिकाची वाहतूक करतांना होणारी कसरत
कमी कशी होईल कारण भरपूर शेती अश्या आहेत कि शेतकऱ्यांना आपल्या पिकाची वाहतूक करायला रस्ता नसल्याने त्यांना जास्त पैसा खर्च करून आपल्या मालाला वाहतूक करण्यासाठी वाहन शेतात जात नसल्याने मजुरी देऊन वाहना पर्यंत न्यावे लागते यांची होणारी फसगत व कसरत पाहता राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्याच्या मार्फत एक योजना महाराष्ट्र च्या शेतकऱ्यासाठी आणली
मुख्यमंत्री यांची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज उपविभागीय कार्यालय, जळगाव जामोद येथे आम डॉ संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक पार पडली.
बैठकीत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित कामांचा सखोल आढावा घेऊन विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले बैठकीत शेतकऱ्यांच्या दृष्टीने या योजनेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगण्यात आले की, शेत / पाणंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत थेट व बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होऊन खर्चात बचत होईल. यावेळी पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर असल्याचे स्पष्ट झाले.
अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद किंवा पूर्णतः बंद झाल्याने अडथळे निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून महसूल विभागामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणाची अचूक नोंद घेणे, संबंधितांना नोटीस बजावणे, ग्रामपंचायत व स्थानिक पातळीवर जनजागृती करून स्वेच्छेने अतिक्रमण काढण्याचे आवाहन करणे, तसेच आवश्यक ठिकाणी कायदेशीर कारवाई करून रस्ते मोकळे करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
पारदर्शक व योग्य वापर करून कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
ही योजना ग्रामीण भागातील शेती व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला..
या वेळी आ. डॉ संजय कुटे, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, एस.डी.पी.ओ. आनंद महाजन, तहसीलदार पवन पाटील तहसील, पंचायत समिती, कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते














