पर्यवारण प्रेमीची वृक्ष संवर्धना साठी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे निवेदन
संरक्षित वृक्ष” म्हणुन घोषीत करण्याची मागणी
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत
येथील पर्यावरण प्रेमी मिळून उपविभागीय अधिकारी यांना
निवेदन दिले जळगांव जामोद येथील एसडीओ कार्यालयाच्या जवळ सध्या सुरु असलेल्या बांधकामाच्या परिसारात जुन्या उपविभागीय अधिकारी कार्यलयाच्या बाजूला जुने सेतू असणारे दुकान पाडण्याचे काम सध्या सुरु आहे त्या ठिकाणी एक अंत्यत प्राचिन, शेकडो वर्ष जुना वड वृक्ष उभा आहे हा वृक्ष केवळ एक झाड नसुन अनेक पिढंयाचा साक्षीदार असून, परिसराच्या पर्यावरणीय समतोलाचा एक महत्वाचा आधार आहे.
वड वृक्ष हा मोठया प्रमाणात ऑक्सीजन देणारा, तापमान नियंत्रीत करणारा, पावसाचे पाणी धरुन ठेवणारा आणि असंख्य पक्षी, प्राणी व जीवसृष्टीला आश्रय देणारा वृक्ष आहे. आजच्या वाढत्या प्रदूषणाच्या, तापमान वाढीच्या आणि हवामान बदलाच्या काळात अशा वृक्षाचे अस्तित्व अंत्यत मौल्यवान आहे. एकदा तोडलेला असा प्राचीन वृक्ष पुन्हा अनेक शतकापर्यत निर्माण होवु शकत नाही, ही बाब लक्षात घेणे अंत्यत आवश्यक आहे.
विकास नक्कीच आवश्यक आहे, मात्र तो निसर्गाशी समन्वय साधून झाला पाहिजे. विकासा च्या नावाखाली जर असे बजुर्ग जुने वडवृक्ष नष्ट झाले तर त्याचा परिणाम पुढील अनेक पिढ्यांना भोगावा लागेल, पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ संस्थांची नव्हे, तर शासन, प्रशासन आणि नागरीकांची व वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव जामोद यांचे कार्यालयांची सुद्धा जबाबदारी आहे.
तरी आपणास विनंती आहे की, सदर बांधकामाच्या कामात आवश्यक ते बदल करुन, कोणत्याही परिस्थितीत या वड वृक्षाला धक्का न लागता त्याचे जतन व संरक्षण करण्यात यावे. गरज असल्यास त्या वृक्षाला “संरक्षित वृक्ष” म्हणुन घोषीत करुन त्या भोवती योग्य ती सुरक्षित व्यवस्था करण्यात यावी. यावर प्रसेनजीत मिश्रा,सुनील भगत,चतुरभूज केला,अविनाश उमरकर,जयदेव वानखडे, गजानन बाठे,शरद जाधव व परिसरातील निसर्ग, पर्यावरण प्रेमीच्या सह्या आहे यांची प्रतिलिपी आ.डॉ संजय कुटे, वन परीक्षेत्र अधिकारी व नगर परिषद मुख्यधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहे.














