Home बुलढाणा अतिक्रमण हटाव मोहीम च्या नावावर समाजात जातीय तेढ निर्माण करू नये :-...

अतिक्रमण हटाव मोहीम च्या नावावर समाजात जातीय तेढ निर्माण करू नये :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष

0
109

अतिक्रमण हटाव मोहीम च्या नावावर समाजात जातीय तेढ निर्माण करू नये :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष

जळगाव जामोद: प्रतिनिधी

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले, कोल्हापूर येथील विशालगड येथे अतिक्रम काढण्याच्या नावावर कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या दरम्यान मुस्लिम समाजाच्या लोकांवर अत्यंत हृदयद्रावक हल्ला करण्यात आला.
मोर्चा काढण्याच्या आधी येथील मुस्लिम समाजाच्या लोकांनी प्रशासना कडे विनंती केली होती,की त्यांच्या वर हल्ला होऊ शकतो,म्हणून त्यांना सुरक्षा पूर्ववावी तथापि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, या हल्या मध्ये मज्जिद, दर्गा , मोटरसाकल , घरांची तोडफोड करण्यात आली.या हिंसाचारात मोर्च्यात सहभागी लोकांनी अवानविय वर्तन केले. त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होऊ शकतो. सदर निवेदनाच्या द्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले की, सदर प्रकरणात निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी यावेळी तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ, शहर अध्यक्ष इरफान खान,जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष एम डी साबीर, जिल्हा प्रवक्ता ॲड.करीम खान, जिल्हा उपाध्यक्ष शेख जावेद , जिल्हा सचिव ॲड. मोसीन खान, तालुका कार्याध्यक्ष महादेव पाटील, शहर कार्याध्यक्ष, सिद्धार्थ हेलोडे, युवक विधासभा अध्यक्ष दत्ता पाटील, ख वि संचालाक अनंता वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष सोशल मीडिया निझाम राज, युवक जिल्हा सचिव शेख ताहेर,संदीप ढगे, साहेबराव शिरसाट, जंगलिमन रायपुरे,उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!