जळगाव जामोद:- प्रतिनिधी अमोल भगत
भारत सरकार च्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र बुलढाणा आणि अरुणोदय बहुउद्देशीय संस्था जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जामोद तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन 31 डिसेंबर व 1 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले होते…. या स्पर्धेमध्ये कबड्डी, खो-खो तसेच शंभर मीटर धावणे, गोळा फेक या अंतर्गत मुला मुलींच्या विविध स्पर्धा पार पडल्या… शहरातील अरुणोदय क्रीडा मंडळाच्या मैदानावर संपन्न झालेल्या या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित यांच्या हस्ते 31 डिसेंबर रोजी संपन्न झाले… याप्रसंगी क्रीडा शिक्षक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण डाबरे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झांबरे, अरुणोदय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद येऊल त्यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते… या स्पर्धेतील कबड्डी या क्रीडा प्रकारात तालुक्यातील एकूण नऊ संघांनी सहभाग घेतला होता… त्यामध्ये दत्तक्रीडा मंडळ आडोळ या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला… त्याच्यासोबत महिलांच्या खोखो गटातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भिंगारा विजयी तर अरुणोदय क्रीडा मंडळाचा संघ उपविजयी ठरला…. वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये गोळा फेक स्पर्धेत मुलींमधून कुमारी रती सुरेश खरात, कोमल माणिक मोहिते आणि मनीषा प्रेमसिंग सोळंकी या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला… तर गोळा फेक मध्येच मुलांमधून वैभव विजय श्रीनाथ चेतन प्रकाश पानेरकर आणि पराग गजानन तायडे ही मुले अनुक्रमे प्रथम,द्वितीय तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले… 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात भारसिंग खरात या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला… स्पर्धेतील सर्व सहभागी व विजयी विद्यार्थ्यांना डॉक्टर प्रवीण डाबरे, महादेवराव सातव, दिलीप बाभुळकर, प्राध्यापक गणेश जोशी, मारुती दातीर, शंकरराव ताडे, मनसे शहराध्यक्ष नागेश भटकर या मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान देऊन सत्कार करण्यात आला…. सदर स्पर्धेकरिता समीर सारोकार, वैभव गणेश, वंदना कतोरे,आदित्य कपले,प्रतीक राऊत व प्रमोद येऊल यांनी पंच म्हणून काम पाहिले…














