.
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-
पत्नीच्या निधनानंतर मिळाले दोन लाखांचे अर्थसहाय्य
जळगाव जामोद: तालुक्यातील सुनगाव येथील महिला रेणुका वसंता ढगे यांचे २८ जानेवारी २०२५ ला दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या या दुःखद निधनानंतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती उमेद या स्वयंरोजगार देणाऱ्या संस्थेने रेणुका वसंता ढगे यांच्या परिवाराला विमा कवच म्हणून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. राज्यातील ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती (उमेद)अभियानाची सुरुवात सन २०११ मध्ये झाली. रेणुका ढगे ह्या गटाच्या सदस्य होत्या. या योजना अंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येते. या अभियानाची अंमलबजावणी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभाग अंतर्गत करण्यात येते. रेणुका वसंता ढगे ह्या अभियानांतर्गत महिला समूहात समाविष्ट झाल्या होत्या. उमेद कँडर बँक सखी यांच्या माध्यमातून सर्व महिलांचे वैयक्तिक खाते काढण्यात आले होते व त्यामधून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढण्यात आला होता. त्यांचा हा विमा काढला असल्यामुळे त्यांना मृत्युपश्चात दोन लाख रुपयांचा विमा मिळाला यावेळी धनादेश वितरण करताना बँकेचे कर्मचारी यांच्यासह शितल राऊत, बँक सखी अंकिता काटोले, प्रतिभा काळपांडे, अनुराधा कोथळकार यांची उपस्थिती होती यावेळी बँक मॅनेजर मेंडके यांचे पूर्ण सहकार्य लाभले.














