जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
विकासकामे आणि दाखले रखडल्याने गावातील नागरिकांना त्रास होत असल्याने जळगाव जामोद पंचायत समिती कार्यालय येथे गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर करून दिला आंदोलनाचा इशारा
तालुक्यातील आसलगाव येथील
संजय उर्फ राजू भोंगाडे, धीरज सावरकर यांनी ,
ग्रामपंचायतीमध्ये गेल्या ०१ वर्षांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्यामुळे गावाचा विकास खुंटला असून, सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही समस्या तातडीने सोडवावी
निवेदनानुसार, सध्या आसलगाव ग्रामपंचायतीचा कारभार ‘अतिरिक्त पदभार’ असलेल्या ग्रामसेवकांकडे सोपवण्यात आला आहे. सदर ग्रामसेवक आठवड्यातून केवळ १ ते २ दिवसच गावात उपस्थित राहू शकतात. याचा थेट परिणाम ग्रामपंचायतीच्या कामकाजावर होत आहे.
निवेदनात मांडलेल्या मुख्य अडचणी:
१.प्रशासकीय कामांचा खोळंबा: ग्रामसेवक वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे जन्म-मृत्यू दाखले, रहिवासी दाखले आणि इतर महत्त्वाच्या प्रमाणपत्रांसाठी ग्रामस्थांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
२.शासकीय योजनांपासून वंचित: केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी गावात होत नसल्याने गरजू लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत.
३.रखडलेली विकासकामे: गावातील रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या कामांचे नियोजन व देखरेख करण्यासाठी पूर्णवेळ ग्रामसेवकाची नितांत गरज असल्याचे आमचे म्हणणे आहे.
या मागणीची
स्थानिक पंचायत समिती प्रशासनाने या अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन आसलगावसाठी तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना दिला आहे.














