
घरगुती नळ कनेक्शन ला दिले वाणिज्य वापराचे देयक
ग्राहकाला व्याजासह रक्कम अदा करण्याचा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश
मजीप्र चा मनमानी कारभार ग्राहकांना नाहक त्रास /भुर्दंड
जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
घरगुती नळ कनेक्शन ला दिले वाणिज्य वापराचे देयक
ग्राहकाला व्याजासह रक्कम अदा करण्याचा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश
मजीप्र चा मनमानी कारभार ग्राहकांना नाहक त्रास /भुर्दंड
स्थानिक हरी ओम नगर मधील डॉ राम शेषराव भोपळे यांनी घेतलेल्या घरगुती कनेक्शन ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभाग जळगांव जामोद यांनी वाणिज्य वापराचे देयक वारंवार देऊन ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी ग्राहकाच्या बाजूने निर्णय देत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने कार्यकारी अभियंता मजिप्रा बुलढाणा आणि उपविभागीय अधिकारी मजीप्रा उपविभाग जळगांव जामोद यांनी तक्रारकर्त्या संदर्भात अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला त्यामुळे वैयक्तिकपणे व संयुक्तपणे तक्रारकर्त्याला 2 हजार 412 रुपये ही रक्कम प्रकरण दाखल तारखेपासून सहा टक्के दसादशे व्याजदराने अदा करावी.
तसेच शारीरिक व मानसिक आणि आर्थिक त्रासाकरिता 2 हजार रुपये आणि खर्च 1 हजार रुपये वरील दोन्ही रक्कम तक्रारकर्त्याला 45 दिवसाच्या आत अदा करावे असा आदेश 1 जानेवारी रोजी केला आहे.
15 एप्रिल 2019 रोजी भोपळे यांनी घरगुती नळ कनेक्शन घेतले मे आणि जून मध्ये त्यांना घरगुती वापराचे देयक देण्यात आले त्याचा त्यांनी भरणा केला. त्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सलग वाणिज्य वापराचे देयक देण्यात आले. ग्राहकाचे घर बंद नसताना सुद्धा घरबंद दाखवून देयक देण्यात आले.
घरगुती वापरायचे वाणिज्यिक वापराची कुठलीही पूर्वसूचना ग्राहकास दिली नाही. या संदर्भात वारंवार अर्ज करूनही कुठलाही प्रतिसाद संबंधित विभागाकडून देण्यात आला नाही. शेवटी नळ जोडणी बंद करण्याची मागणी सुद्धा ग्राहकाकडून करण्यात आली. तरीही दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे ग्राहकाला आर्थिक शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.
या संदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार कागदपत्रांसह सर्व प्रकरणाची पडताळणी करून विद्यमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र उल्हास मराठे यांनी हा आदेश केला आहे.













