Home बुलढाणा महायुतीचा जिल्हास्तरीय संमेलन व पदाधिकारी- कार्यकर्ता मेळावा शेगांव येथे संपन्न

महायुतीचा जिल्हास्तरीय संमेलन व पदाधिकारी- कार्यकर्ता मेळावा शेगांव येथे संपन्न

0
131

शेगांव(प्रतिनिधी):-

संत नगरी शेगांव येथील देशमुख मंगल कार्यालय येथे शिवसेना,भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आर. पी. आय, प्रहार जनशक्ती पक्ष, रयत क्रांती संघटना, स्वाभिमान, भीमसेना, पी. जे. पी,शिवसंग्राम व मित्रपक्षांच्या जिल्हास्तरीय संमेलन व पदाधिकारी- कार्यकर्ता मेळाव्याला शिवसेना नेते खा.प्रतापरावजी जाधव साहेब यांनी संबोधित केले.

प्रंसगी माजी मंत्री आ डॉ.संजयजी कुटे,माजी मंत्री आ डॉ.राजेंद्रजी शिंगणे तथा अन्य मान्यवर मंडळी यांनी मार्गदर्शन केले.

आगामी काळात एकदिलाने काम करूया आणि महायुतीचा विजय खेचून आणूया असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.

सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे विचार आणि कार्यप्रणाली तथा तत्त्वांशी प्रामाणिक राहून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ताकदीने काम करण्याच्या सूचना महायुतीच्या नेते यांनी करत कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे नक्कीच मोठ्या यशात रूपांतर होईल. अशी ग्वाही महायुतीच्या नेते मंडळी यांनी यावेळी दिली.

यावेळी आ.संजयजी रायमुलकर, आ.आकाश जी फुंडकर, आ.संजय जीगायकवाड,आ.श्वेताताई महाले, माजी आमदार चैनसुखजी सेंचती, डॉ.शंशिकांत खेडेकर, विजयराज शिंदे तथा शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आर. पी. आय, प्रहार जनशक्ती पक्ष, रयत क्रांती संघटना, स्वाभिमान, भीमसेना, पी. जे. पी, शिवसंग्राम व मित्रपक्षांचे मा.जिल्हाप्रमुख तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!