Home बुलढाणा बनावट फेरफार प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

बनावट फेरफार प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

0
147

 

जळगांव जामोद(प्रतिनिधी):-

तालुक्यात येत असलेल्या जामोद गावातील नोकरीवर असलेल्या एका इसमाने आपल्याच चुलत्याच्या शेतीचा फेरफार करून शेती हडप केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपीसह तलाठी व मंडल अधिकाऱ्या विरोधात जळगांव जामोद पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी दिले असून तिनही आरोपीविरुद्ध स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की जामोद येथील रामकृष्ण सोळंके व त्यांच्या दोन पत्नी यांच्या मृत्यूनंतर जामोद गावातील मौजे खेल शिवापूर येथील गट नंबर 87 शेतीचे खोटे कागदपत्र तयार करून आरोपी उखर्डा सोळंके यांनी न्यायालयातून वारस प्रमाणपत्र मिळविले होते. त्याचा वापर या आरोपीने मालमत्ता हस्तांतरणासाठी करून आरोपी तलाठी आदिती मुळे व मंडळ अधिकारी पंजाब चोपडे यांच्यासोबत हात मिळवनी करत शेतीबाबत फेरफार करून शेती हडप करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यामुळे मृतकाचा चुलत भाऊ श्रीकृष्ण तुळशीराम सोळंके यांने पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे संबंधित आरोपी विरोधात तक्रार केली होती. परंतु पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे फिर्यादी श्रीकृष्ण सोळंके यांनी वकिलामार्फत दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी जळगांव जामोद न्यायालयात अँडवोकेट पीएस मनसुटे यांच्यामार्फत सीआरपीसीचे कलम 156 (3)नुसार केस दाखल केली होती.

न्यायालयाने फिर्यादी श्रीकृष्ण सोळंके यांनी दिलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करून संबंध प्रकरणात निर्णय देत आरोपी उखर्डा सोळंके वय 50 राहणार जामोद, तलाठी आदिती मुळे व तत्कालीन मंडळ अधिकारी पंजाब चोपडे यांच्या विरोधात जळगांव जामोद पोलीस स्टेशन येथे तीनही आरोपी विरोधात कलम 464,465, 467, 468, 471, 472, 420, 34 भादविनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने संबंधित आरोपी विरोधात दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शशिकांत दोडके करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!