Home बुलढाणा खरेदी विक्री संस्था जळगांव जामोद चे उपाध्यक्ष पदी शांताराम धोटे अविरोध

खरेदी विक्री संस्था जळगांव जामोद चे उपाध्यक्ष पदी शांताराम धोटे अविरोध

0
152

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

खरेदी विक्री संस्था जळगांव जा. चे उपाध्यक्ष पदाची निवड सभा पार पडली यावेळी एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची उपाध्यक्ष पदी अविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. महेश कृपलांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जळगांव जा. यांनी काम पाहिले व संस्थेचे व्यवस्थापक प्रल्हाद वायझोडे यांनी त्यांना सहकार्य केले.
निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर संस्थेचे मुख्यालयात स्वागत समारंभ पार पडला यावेळी कार्यकमाचे अध्यक्ष सहकार नेते प्रसेनजीत पाटील पणन महासंघाचे उपाध्यक्ष तथा सभापती कृ. ऊ. बा. स हे होते. यावेळी नवनिर्वाचित उपाध्यक्ष शांताराम धोटे यांचा सत्कार दत्ता पाटील सहसंपर्क प्रमुख शिवसेना ऊबाठा, गजानन वाघ ,विश्वास पाटील विधानसभा प्रमुख (राष्ट्रवादी शरद पवार), विठ्ठल वाघ अध्यक्ष खरेदी विक्री संस्था जळगांव जा., रमेश ताडे, अरुण पारवे वंचीत बहुजन आघाडी, तुकाराम काळपांडे उपाध्यक्ष शिवसेना उबाठा, विजय काळे, राजू बाप्पू देशमुख,वसंतराव वारुळकर, विजय ठाकरे, दत्ता डिवरे,आशिष वायझोडे, इरफान शेट्टी, गुणवंत पाटील, सुरेश उगले,भीमराव पाटील, उल्हास माहोदे, संचालक कृ. ऊ. बा. स. जळगांव, मंगल डोंगरदिवे, संजय दंडे व संस्थेचे सर्व संचालक मंडळ हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!