जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-
मुलींना सक्षम बनवा अबला नव्हे तर सक्षम नेतृत्व करणारी बनवा
-जिजा राठोड चांदेकर
जागतिक महिला दिन आठ मार्च औचित्य साधून 9 मार्चला जळगाव जामोद नोकरीमध्ये नगरपरिषदच्या सांस्कृतिक भवन मध्ये व्हिडिओ वॉलेंटियर्स च्या सौजन्याने विनोद वानखडे व फुले शाहू आंबेडकर विचार मंच जळगाव जामोद संग्रामपूर च्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजा राठोड चांदेकर उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ च्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर मोना चिमोटे प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर लता भोसले बाहेकर व तुमची ग्रामपंचायतच्या सरपंच सीमा वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रातील नोकरी राजकारण समाजकारण व तळागाळातील कर्तुत्वान महिला भगिनी अशा 35 भगिनींचा मोमेंटो व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला सत्कारमूर्ती संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून उपस्थित होत्या.
डॉक्टर मोना चिमोटे यांनी जागतिक महिला दिना संदर्भात इन्होने घेतलेली भूमिका यासंदर्भात सविस्तर माहिती दिली व जागतिक महिला दिन केव्हा व केव्हापासून साजरा करण्यात येतो या संदर्भात माहिती दिली
डॉक्टर लता बाहेकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सांगितले की नारीशक्ती जी दातृत्व कर्तृत्व मातृत्व व नेतृत्व या चारही बाजूने निसर्गाने नटवलेली एक अद्भुत शक्ती आहे तिच्याशिवाय हे जग अपूर्ण आहे श्री शक्ती ही पुरुष शक्ती पेक्षा वेगळी नसून समान आहे दोन्हीही शक्ती एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.
जिजा राठोड चांदेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले की मुलींमध्ये सौंदर्य न घडवता तिची ताकद वाढवा. ती एक अबला नसून या देशाचे उज्वल भविष्य घडवणारी नारीशक्ती आहे रूढी परंपरेने आलेल्या वारसा हक्कावर मुलींचेही तेवढेच हक्क आहे जर आपण जागतिक महिला दिन साजरा करत असू तर माझी महिला भगिनी स्वतः खंबीरपणे ती स्वतःची रक्षण करणारी आपण घडवली पाहिजे मुलींच्या कर्तुत्वात जो कोणी आडवा येत असेल त्याला आडवा करण्याची ताकद माता-भगिनींनी त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता कोकाटे यांनी केले तर प्रास्ताविक आयोजक विनोद वानखडे यांनी 2023 पासून कार्यक्रमाची रूपरेषा सांगून कार्यक्रम कसा व कुठल्या परिस्थितीत करत असल्याचा आढावा सांगितला आपल्या प्रास्ताविकामध्ये व्हिडिओ वाल्युटींअर्स करत असलेल्या कामा संदर्भातही सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऋतुजा इंगळे बीएसडब्ल्यू महाविद्यालय मलकापूरची विद्यार्थिनींने केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फुले शाहू आंबेडकर विचार मंच जळगाव संग्रामपूर चे सदस्य भाऊ भोजने, जी के मोरे, अभय मारोडे, मीनाताई सातव, विजय पोहनकर, मिलिंद वानखडे, प्रशिक वानखडे व मित्र मंडळ मंडळ यांनी परिश्रम घेतले














