जळगाव जामोद : प्रतिनिधी
अमोल भगत :-
या मतदारसंघाचे सलग पाच वेळेस नेतृत्व करणारे आ. डॉ. संजय कुटे यांचा ९ मार्च रोज़ी वाढदिवस मोठ्या उत्साहात कार्यकर्ते साजरा करणार आहेत. या निमित्ताने मतदार संघातील विविध गांवामधे सेवा उपक्रम व क्रीड़ा स्पर्धा अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये भव्य रक्तदान शिबीर, वृक्षलागवड, न.प. शालेय विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाणि बॉटल वाटप, रुग्णांना फळवाटप, महिला दीनानिमित्त महिलांना मार्गदर्शन, खो-खो स्पर्धा, शूटिंग बॉल स्पर्धा, लाडुतुला असे विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहे.
शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची लागणार रीघ.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. डॉ. संजय कुटे हे सलग पाचव्यांदा भरघोस मतांनी निवडून आले आहेत. त्यानंतर घड़लेल्या राजकीय घड़ामोड़ीमुळे अनेक कार्यकर्ते आ. कुटेंशी निवांत संवाद साधू शकले नाही. त्यामुळे ते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे यंदाचा वाढदिवस हा कार्यकत्यांसाठी महत्वाचा असून शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रिघ लागणार आहे असे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपाने सुद्धा हा अभीष्टचिंतन सोहळा दणदणीत राजरा करण्याचे निश्चित केले असुन त्या अनुषंगाने शहरातील पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण नियोजन बैठक ४ मार्च रोज़ी हॉटेल शिवालय येथे बैठक पार पड़ली आहे. यानिमित्ताने जळगाव जामोद मतदार संघातीलप्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःच्या रेफरल कोड नुसार किमान ५० भाजपा सदस्य नोंदणी करुण वाढदिवसाची भेट मला द्यावी असे आवाहन आ. डॉ. कुटे यांनी केले असल्याचे या बैठकित प्रदीप सांगळे यांनी सांगितले.
पूर्वसंध्येला भजन संध्या
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ८ मार्च रोज़ी संध्याकाळी ७ वाजता जळगाव जामोद येथील न्यायालयासमोरील श्रीराम कुटे गुरुजी सिटी च्या प्रांगणात प्रसिद्ध ओकान्हा भक्ती संगीत ग्रुप मुंबई द्वारा भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्याचा आस्वाद नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांच्या मित्र परिवाराने केले आहे.














