Home बुलढाणा प्रा.संतोष जाधव यांना रा. से. यो. आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्रदान

प्रा.संतोष जाधव यांना रा. से. यो. आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्रदान

0
316

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग अमरावती द्वारा आयोजित राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर चे विभागीय नेतृत्व गुणविकास शिबिर बिहाली ता. चिखलदरा जि.अमरावती येथे पार पडले या शिबिरामध्ये आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यामधून महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय खेर्डा ता. जळगाव (जामोद) जि.बुलढाणा येथील प्रा.संतोष जाधव यांना राष्ट्रीय सेवा योजना आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कार 2024 -2025 प्रदान करण्यात आला.

प्रा.संतोष जाधव हे महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या गेल्या 14 वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्य पहात असून त्यांनी दरवर्षी आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरा अंतर्गत ग्राम निंभोरा बु, वडगाव (पाटण) अकोली बु,सावळा, वडशिंगी या गावांमध्ये शोष खड्डे ,ग्रामस्वच्छता ,नद्यांवर सिमेंट थैलीचे बंधारे बांधणे,रस्त्यावरील खड्डे बुजविणे महा आरोग्य शिबिरे आयोजित केली त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांनी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रम आणि स्वयंसेवकांमध्ये नेतृत्व गुण रुजविण्यासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

या पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी पीपल्स वेल्फेअर सोसायटी अमरावतीचे सचिव प्रा.अभिजीत देशमुख संचालक प्राचार्य जीवनराव देशमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर चे विभागीय समन्वयक प्रा. विशालजी जाधव सर तसेच अमरावती विभागातील पाचही जिल्हा समन्वयक,कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.संतोष जाधव यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री संत सावता माळी एज्युकेशन सोसायटी जळगाव (जामोद) चे अध्यक्ष मा. संजय उमरकर संस्थेचे सचिव मा अविनाश उमरकर, प्राचार्य प्रा.एस. एन. बोंबटकार सहकारी प्रा.विनोद धर्माळ,प्रा.पंकज केदार,प्रा.योगेश भिवटे प्रा. अमोल वानखडे तसेच कार्यालयीन कर्मचारी वृंदांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!