Home बुलढाणा जनता विद्‌यालय, जामोद ची ‘इकोव्हिजन पेपर फैक्ट्री तथा रिच अक्वा (Aqua) पाणी...

जनता विद्‌यालय, जामोद ची ‘इकोव्हिजन पेपर फैक्ट्री तथा रिच अक्वा (Aqua) पाणी शुद्धीकरण केंद्राला’ क्षेत्र भेट

0
537

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-

शालेय उपक्रमांतर्गत जनता विद्‌यालय, जामोद च्या इयत्ता 6 वी च्या वि‌द्यार्थ्यांनी येशील इकोविजन हस्तनिर्मित पेपर फैक्ट्री तथा रिच अक्वा
पाणी शुद्‌धीकरण केंद्राला क्षेत्रभेट देवून आनंद लुटला.

सर्वप्रथम वि‌द्यार्थ्यांनी आमच्या शाळेचे सचिव तथा इकोक्जिन पेपर फैक्ट्रीचे सर्वेसर्वा अनुप पुराणिक , यांच्या इकोविजनला भेट दिली. अनुप पुराणिक यांनी विदयाथ्यांना हस्तनिर्मित पेपर कसा बनतो यांची माहिती दिली. या भेटीत पेपर कसा दाबला जातो, कसा वाळवला जातो याविषयी प्रत्यक्ष कार्यस्थळावर नेऊन सविस्तर माहिती दिली, विद्‌यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देवून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना हस्तनिर्मित पेपर नमूना व बिस्किट पाकिटे देवून सहभोजन झाल्यावर विदयार्थ्यांना निरोप दिला

त्यानंतर वि‌द्यार्थ्यांनी रिच अक्वा पाणी शुद्धीकरण केंद्राला भेट दिली. येथे पाणी कसे शुद्ध केले जाते, ते कसे बॉटलमध्ये भरले जाते, बाँटल्स कशा पैक केल्या जातात याविषयी तेथील कर्मचायांनी योग्य माहिती दिली व विदयार्थ्यांनी ते सविस्तरपणे जाणून घेतले. शुद्ध – पाण्याच्या च्या बॉटला भेट देवून तेथील कर्मचान्यांनी सर्व या विदयार्थ्यांना निरोप दिला

सदर क्षेत्रभेटीचे नियोजन तथा आयोजन शाळेचे मुख्याध्यापक . आर. बी. राजपूत, पर्यवेक्षक मा. ए.एस. कुळकर्णी शिक्षक आर एम. उपासे,इतर शिक्ष‌क तथा शालेय कर्मचारी सुधाकर करांगळे यांनी केले. शेवटी दोन्ही होत्रभेटीतून विद्यार्थ्यांना भरपूर अध्ययन अनुभव तथा मनसोक्त आनंद मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!