वायाळ समशान भूमी ते खामखेड शेत रस्त्याची दुरुस्ती करून द्या शेतकऱ्यांची निवेदन
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत वायाळ समशान भूमी ते खामखेड हनुमान मंदिर व कालिंका माता मंदिर ते कहूपट्टा गोराळा धरणाकडे जाणारा रस्ता रुंद व दुरुस्त करून देण्यात यावा.
यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले दिलेल्या निवेदनामध्ये शेतकऱ्यांनी नमूद केले की आमची शेती मौजे खामखेड वायाळ खेलखाचा खेल फूट खेलबारी खेल मूर्तिजापूर गहूपट्टा या शिवारातील शेतकरी ये जा करत असून आम्ही खामखेड शिवारातील बहुसंख्य शेतकरी केळी उत्पादक संत्रा व इतर फळपिके उत्पादक शेतकरी असून सदरहू विषयांची नमूद केलेला रस्ता हा जळगाव जामोद शहरातून निघून शहरातील वायली वेस संत रूपलाल नगर समोरून जाऊन पुढे समशानभूमी तिथून पुढे गोराडा धरणाकडे जाणारा रस्ता असून सदरहू रस्त्यामध्ये दोन ठिकाणी नदी तसेच अरुंदु भाग असलेला रस्ता असून सदरहू रस्ता हा पावसाळ्यामध्ये वाहतूक करण्यास अत्यंत अडचणीचा व गैरसोयीचा आहे. आम्ही सर्व शेतकरी हे बागायती स्वरूपाची तसेच हंगामी बागायती पिके घेत असून सदरहू पिकांची वाहतूक व काढणे हे बाराही महिन्यातील वेगवेगळ्या मोसम मध्ये करावी लागते.
तसेच केळी व संत्रा पिक हे एन पावसाळ्यात काढणीला येत असून सदरहू शेतमाल हा मोठ्या वाहनाशिवाय वाहतूक करणे शक्य नसल्याने मोठ्या मालवाहक गाड्या कच्च्या रस्त्याने येत नसल्यामुळे पिकांची खूप नासाडी होते. अशा प्रकारच्या खूप मोठ्या समस्यांमध्ये आज रोजी शेतकरी सापडलेला आहे.
सदरहू रस्ता हा दुरुस्त होणे खूप गरजेचा असून मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत रस्ता मजबुतीकरण करून मिळणे अत्यंत गरजेचे आहे. अशा 9 जानेवारी रोजी जळगाव तहसीलदार यांना देण्यात आले.
निवेदनावर निलेश कपले, अनंता फुसे, चिंतामण मिसाळ, गजानन ढगे, महेंद्र बोडखे, पांडुरंग दातीर, रोहित मिसाळ, गणपत फुसे, अशोक दातीर, अरुण दातीर, शंकर राऊत, सुरेश राऊत पांडुरंग वंडाळे, सुरेश केदार, सचिन वानखडे, योगेश मिसाळ, समाधान पाटील, वसंत कपले, पुंजाजी हागे, सोनाजी हागे, शशिकांत ढगे, संजय भगत सह शेतकऱ्यांच्या सह्या निवेदनावर होत्या.














