Home बुलढाणा सागाची अवैध कत्तल व वाहतूक थांबवा

सागाची अवैध कत्तल व वाहतूक थांबवा

0
145

सागाची अवैध कत्तल व वाहतूक थांबवा

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-

तालुक्यात सागाच्या लाकडाची अवैध कत्तल करून स्थानिक परिसरात फर्निचर तयार करण्याचे बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा गंभीर आरोप उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व प्रकार वनविभागाच्या समोर सुरू असल्याचा दावा त्यांनी निवेदनाद्वारे केला आहे. येत्या सात दिवसात हे अवैध धंदे बंद न झाल्यास थेट वनविभागावर धडक देण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

परिसरात दररोज १० ते १२ फूट ओल्या सागाची अवैध वाहतूक होत असल्याचा आरोप आहे. नागरिकांकडून हे लाकूड अत्यल्प दरात खरेदी करून त्यापासून दरवाजे व महागडे फर्निचर तयार करण्यात येत आहे. या बेकायदेशीर व्यवहारांमुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून, जंगल (वन) संपदेचेही गंभीर नुकसान होत आहे असे निवेदनात म्हंटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!