थकीत कोरोना भत्यासाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन.. पंचायत समिती वर महिलांचा मोर्चा..!
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
कोरोना काळापासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांचा भत्ता थकीत आहे. वारंवार मागणी करून निवेदन देऊन मोर्चा काढून सुद्धा शासनाने ती पूर्तता केली नाही.
सिटु च्या वतीने जिल्हाध्यक्ष कॉम्रेड पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वातअंगणवाडी कर्मचारी संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका महासंघ जिल्हा बुलढाणाच्या वतीने ९ जानेवारी रोजी येथील तहसील आणि पंचायत समिती कार्यालयात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनामध्ये २३ महिन्याचा थकीत कोरोना भत्ता तत्काळ देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. याचसोबत कामगार विरोधी मालक धार्जीनिया चार श्रमसंहिता ताबडतोब मागे घ्यावी, सर्व कामगार कायदे पुन्हा बहाल करावे, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील स्थापना कंपन्या व सेवेचे खाजगीकरण ताबडतोब थांबविण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि शालेय पोषण आदी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची भारतीय श्रम परिषदेची शिफारस अमलात आणण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व करताना जिल्हाध्यक्ष कॉम्रेड पंजाबराव गायकवाड आणि सहभागी सेविका मदतनीस.














