Home इव्हेंट आदिवासी समाजाचा २५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

आदिवासी समाजाचा २५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

0
238

आदिवासी तडवी व भिल्ल समाजाचा २५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

रसलपूर ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा SARCO Foundation (नोंदणी क्र. 28B/113/2025) यांच्या विद्यमाने आदिवासी तडवी व भिल्ल समाजाचा २५ जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता रसलपूर ता. जळगाव जामोद येथे मोठ्या उत्साहात व सामाजिक सलोख्याच्या वातावरणात पार पडला.

या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नवदाम्पत्यांना मोठा आधार मिळाला असून समाजात एकात्मता, सहकार्य व सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी . स्वाती वाकेकर, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पक्षनेत्या, जळगाव जामोद उपस्थित होत्या.

प्रमुख पाहुणे मोहन व्यवहारे आदिवासी प्रकल्प अधिकारी, अकोला, मजीत हा. हमीद तडवी विधीमान अधिकारी, मुंबई, फरीद पिरखाँ तडवी मुंबई पोलिस, डॉ. जीशान हुसेन अप्पल हॉस्पिटल, अकोला यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून एस. बी. तडवी राष्ट्राध्यक्ष, आदिवासी एकता मंच महाराष्ट्र राज्य आणि मौलाना अब्बास खान फैज्याज खान तडवी जळगाव जामोद
यांनी नवदाम्पत्यांना शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, आदिवासी नेते, कार्यकर्ते, महिला मंडळे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये सामूहिक विवाहातील नवदाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. यामध्ये पलंग, गादी, आलमारी, किचन सेट आदी साहित्याचा समावेश होता.

तसेच सर्व उपस्थितांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था आयोजक समितीच्या वतीने करण्यात आली होती.
या भव्य सोहळ्याचे आयोजन व नियोजन  आदिवासी तडवी-भिल्ल एकता मंच, बुलढाणा तसेच आदिवासी एकता ग्रुप, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक समितीतील पदाधिकारी, स्वयंसेवक व समाजबांधवांनी व हाफिज सत्तार तडवी यांनी परिश्रम घेतले.  सामूहिक विवाह सोहळ्यामुळे अनावश्यक खर्च टाळून साधेपणा, सामाजिक बांधिलकी व संस्कार जपण्याचा आदर्श निर्माण झाला. अशा उपक्रमांमुळे समाजातील एकोपा अधिक बळकट होत असून पुढील काळातही असे उपक्रम राबवावेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!