Home इव्हेंट बापुमिया महाविद्यालयामध्ये महिला उद्योजकता कक्षा द्वारा एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

बापुमिया महाविद्यालयामध्ये महिला उद्योजकता कक्षा द्वारा एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

0
411

बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महिला उद्योजकता कक्षा द्वारा एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-

सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पळशी वैद्य द्वारा संचालित बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे, येथील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲड. सलीम बापुमिया पटेल, सहसचिव रब्बानी देशमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.फराह शेख व आय. क्यू. ए. सी. यांच्या मार्गदर्शनातून दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयाच्या महिला उद्योजकता कक्षा द्वारा मेहंदी डिझाइन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यशाळेची सुरुवात स्व.बी. एस.पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. महिला उद्योजकता कक्षाचे समन्वयक डॉ. सी.बी.पलन यांनी कक्ष स्थापने मागील हेतू यावेळी समजून सांगितला.

सदर कक्ष हा महिलांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि सहाय्य देण्यासाठी स्थापन केलेला एक महाविद्यालयीन कक्ष आहे, जो नेटवर्किंग, निधी, मार्गदर्शन आणि व्यवसाय विकासासाठी विद्यार्थिनींना संधी देतो, ज्यामुळे महिलांना त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू करणे आणि वाढवणे सोपे होते. आणि देशाच्या आर्थिक विकासात त्यांचे योगदान वाढते.

सदर कक्षाची मुख्य उद्दिष्टे व कार्य, महिलांना उद्योजकीय प्रवासात सामील होण्यासाठी प्रेरित करणे, कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, स्टार्टअप इंडिया, मुद्रा आणि स्टैंड-अप इंडिया सारख्या योजनांद्वारे आर्थिक सहाय्य आणि कर्ज मिळवून देणे, इतर महिला उद्योजकांशी जोडण्यासाठी आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, उद्योजकतेला दिशा देण्यासाठी अनुभवी व्यावसायिकांकडून मार्गदर्शन पुरवणे, व्यवसाय नोंदणी, कर आणि कायदेशीर बाबींमध्ये मदत करणे ही आहेत.

असे यावेळी विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले. तसेच या कार्यशाळेचे प्रमुख वक्ता म्हणून लाभलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.फराह शेख यांनी विद्यार्थिनींना लघु उद्योगाला प्रोत्साहित व चालना मिळण्यासाठी सदर कक्षेचे महत्व पटवून, कौशल्य विकासावर आधारित जसे काही ब्युटी पार्लर, मेहंदी डिझाईन, केक मेकिंग, इत्यादी व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरित केले व विद्यार्थिनींना मेहंदी या विषयावर माहिती व प्रशिक्षण दिले.

सदर कार्यशाळेचे आयोजन महिला उद्योजकता कक्ष यांनी केले असून. आभार प्रदर्शन डॉ. डी. आर. सिरसाट यांनी केले व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी कार्यशाळेला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!