Home बुलढाणा बँड कलाकारांना लोक कलावंताचा दर्जा मिळण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार विजय अंभोरे

बँड कलाकारांना लोक कलावंताचा दर्जा मिळण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार विजय अंभोरे

0
174

 

बुलढाणा प्रतिनिधी किशोर सोनोने :-

बँड कलाकारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना लोककलावंताचा दर्जा मिळुन शासनाकडून मानधन मिळावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन मातंग समाजाचे लोकप्रिय नेते तथा राज्याचे शिवसेना नेते विजय अंभोरे यांनी शिवसेना शिव लहुसेना संघटना बुलडाणा चे वतीने आयोजित केलेल्या बँड मालक व कारागीर यांच्या बैठकी दरम्यान केले,

या अध्यक्षीय स्थानावरून पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की बँड मालक व कारागीर यांनी बँड संबंधित असलेल्या समस्या, व अडचणी सोडवत असतांनाच मुलांना सुद्धा चांगले दर्जेदार शिक्षण देवून त्यांचे भविष्य घडविण्याचे आवाहन सुद्धा या प्रसंगी त्यांनी केले.  दिनांक १८ जानेवारी रविवार रोजी बुलडाणा येथील विश्रामगृह येथे शिवसेना शिव लहुसेना संघटनेच्या वतीने बँड मालक व कारागीर यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

या वेळी प्रमुख उपस्थिती मध्ये धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांचे स्विय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, बैठकीचे आयोजक शिवसेना शिव लहुसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तांबे, तथा बँड मालक व कारागीर यांचे प्रतिनिधी दादाराव महाले, विजय पारेकर, प्रविण कांबळे, सागर साळवे , आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बँड वादकांचे प्रमुख समस्या व अडचणी यांवर चर्चा करण्यात आली या मध्ये वृद्ध कलाकारांना लोक कलावंताचा दर्जा मिळावा तसेच आरटिओ तथा पोलिस प्रशासना कडून बँड पथकाचे वाहनांची अडवणुक केल्या जावु नये यासाठी उपाय योजना करण्यासाठी व मातंग समाजातील नवयुकांना पोलिस प्रशासना चे बँड पथकामध्ये जास्तीत जास्त संख्येने समाविष्ट होता यावे या करिता जिल्हा स्तरावर बँड वादक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्या बाबत शासन स्तरावर मागणी करण्याची चर्चा करण्यात आली, व या बाबत शासना कडे पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले व प्रथमतः धर्मवीर आमदार मा संजुभाऊ गायकवाड यांना सदर मागण्यांचे निवेदन येत्या २५ जानेवारी रविवार रोजी प्रत्यक्ष भेटून देण्याचे नियोजन ठरले व बँड वादकांचे विविध प्रकारच्या समस्या चे निवारण करण्यासाठी बँड वादक युनियन गठित करण्याचे एकमताने ठरले.

याप्रसगी शाम साळवे, महेन्द्र वानखेडे, गणेश क्षिरसागर, विनोद महाले, संजय काकफडे, अनिल सकळकर, मंगेश सकळकर, सुरेश वानखेडे, कैलास मोरे, विठ्ठल अवसरमोल, नाना बोरले, दिलीप अंभोरे, रविंद्र हिवाळे, गजानन गायकवाड, तेजराव निकाळजे, अंबादास ससाणे, माऊली भारज, किष्णा वानखेडे, सचिन काकफळे, आत्माराम यंगड, पत्रकार किशोर सोनोने, वृक्षभ क्षिरसागर, सागर मास्टर, शेषराव साळवे, कडु सुरडकर, दयाराम सोनोने, गणेश सकटकडे, रमेश सुरुशे, दिपक महाले, दिलीप पाटोळे, सुनिल पाटोळे आदीसह असंख्य बँड मालक व कारागीर यावेळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!