Home बुलढाणा इंधन दरवाढीसंदर्भात निषेध करून तालुका काँग्रेसने निवेदन देत केली निदर्शने

इंधन दरवाढीसंदर्भात निषेध करून तालुका काँग्रेसने निवेदन देत केली निदर्शने

0
17

 

 

नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे : पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या दरांवर तात्काळ नियंत्रण आणावे यां प्रमुख मागणी साठी तालुका काँग्रेस कमिटीने जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आ. राजेश एकडे यांचे नेतृत्वात २५ मे रोजी तहसील कार्यालय नांदुरा येथे वाढत्या महागाई बाबत सरकारची विफलता व उदासीन धोरणाविरुद्ध तीव्र निदर्शन करीत केंद्र व राज्य सरकारचा निषेद व्यक्त केला. यावेळी तहसिदार यांना एक निवेदन देण्यात आले.यां निवेदनात, सध्या पेट्रोल, डिझेलतसेच घरगुती गॅस यांच्या दरामध्ये दिवसेंदिवस सातत्याने वाढ होत असून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवन अत्यंत कठीण बनले आहे. वाढत्या इंधन दरामुळे वाहतूक खर्च, शेती उत्पादन खर्च, जीवनावश्यक वस्तूंचे दर आणि दैनंदिन गरजांच्या वस्तू महाग होत आहेत. याचा थेट परिणाम गरीब, शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय यांचेवर होत आहे. तसेच अनेक ठिकाणी इंधनाचा अपुरा पुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या दरांवर तात्काळ नियंत्रण आणावे., इंधनावरील अतिरिक्त कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा., इंधनाचा नियमित व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा., महागाई नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात., जनतेच्या हिताच्या धोरणांना प्राधान्य देऊन त्वरित निर्णय घ्यावेत. वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे नमूद असून हे निवेदन व निदर्शने करते वेळी प्रकाशभाऊ पाटील जिल्हाध्यक्ष, माजी आ. राजेशभाऊ एकडे, विजयसिंग राजपुत, भगवान धांडे सभापती कृ उ बा स,, मोहतेशाम रजा, पुरुषोत्तम झाल्टे, पुंजाजी उखर्डा धोटे, निलेश पाउलझगडे, शंकरराव एकडे, आशा प्रकाश गोंड, जयप्रसादसिंग राजपुत, संदीप बोचरे, गणेश पाटील विनलकुमार मीरगे यासा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!