नांदुरा येथे वारकरी धर्म परिषदेची संवाद परिषद संपन्न.
जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या जाहीर.
नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे
23/05/2026 रोजी नांदुरा तालुक्यातील अजंता मंगल कार्यालय परिसरातील देवाधिदेव महादेव मंदिर सभा मंडपामध्ये वारकरी धर्म परिषदेची संवाद परिषद उत्साहात संपन्न झाली.यावेळी वारकरी धर्म परिषदेची कार्यपद्धती आणि भविष्यातील गाव तेथे सामूहिक हरिपाठ ज्ञानेश्वरी पठण संस्कार शिबिरांचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने कार्यकारिणी गठित करण्यात आली.
यावेळी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी धर्मभूषण ह भ प वासुदेव महाराज शास्त्री विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुप्रसिद्ध कथाकार विलास महाराज वाघमारे राष्ट्रीय महासचिव हभप अँड.सतीशचंद्र रोठे पाटील,जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज घोंगटे, जिल्हा सचिव शेख यूनूस, जिल्हा सल्लागार हभप मधुकर महाराज इंगळे, नंदाताई सोनोने, हभप ज्ञानदेव महाराज भांबेरे पाटील, नांदुरा तालुका अध्यक्ष मंदाताई सोनटक्के तालुकाध्यक्ष नांदुरा हभप स्वरूप महाराज घाडगे, शेगाव तालुकाध्यक्ष हभप डोंगरकार यासह मलकापूर खामगाव मोताळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
राम कृष्ण हरी..!🚩














