नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नांदुरा नगर शाखेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
शहरातील वॉर्ड क्र. ०१ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संघाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी रा.स्व. संघाचे तालुका संघचालक मा. विजयजी सारभुकन, नगर संघचा
लक मा. संजयजी नेमाडे आणि नगर कार्यवाह हरीशजी वायचोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला संघाचे अन्य स्वयंसेवक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रमानंतर अशोकराव बोदवडे व जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. महादेवजी धंदरे साहेब यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराचे कौतुक केले व उपस्थित सर्व स्वयंसेवकांचे आभार मानले.
परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.














