Home बुलढाणा सुनगावात अवैध दारू विक्री जोमात.. तर राज्य उत्पादन शुल्क कोमात…

सुनगावात अवैध दारू विक्री जोमात.. तर राज्य उत्पादन शुल्क कोमात…

0
209

 

सुनगांव प्रतिनिधी –

सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालय व जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या ५० मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केल्या जात आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत असून गावातील तरुण युवक सुद्धा दारूच्या आहारी जात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी व गावठी दारू विक्री जोमाने होत असून या दारू विक्रेत्यांवर प्रशासनाचे कोणतेही बंधन नाही त्यामुळे खुलेआम हे दारू विक्रेते अवैधरित्या दारू विकत आहेत. त्यामुळे येथील तरुण पिढी या दारूच्या आहारी जात असून सुनगाव येथील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. तसेच अनेकांचे संसारही उध्वस्त होत आहेत. मागील वर्षी सुनगाव ग्रामपंचायत प्रशासनाने गावात अवैध दारू पूर्णपणे बंद करण्यात यावी असा ठराव घेऊन त्या ठरावाची एक प्रत जळगाव जामोद पोलीस स्टेशनला सुद्धा देण्यात आली होती परंतु अद्यापही सुनगाव येथील अवैध दारू विक्री बंद झालेली नाही उलट येथे दोन्हीही शाळेच्या काही अंतरावर मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत खुलेआम होत असून याकडे राज्य उत्पादन शुल्क तसेच पोलीस विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!