जळगाव जामोदः प्रतिनिधी अमोल भगत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीयमधून एक समजले जाणारे जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले डॉ. संजय कुटे यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पद मिळणार असल्याचे चर्चा सध्या जोरात सुरू असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय माहिती राजकिय वर्तुळातून येत आहे. डॉ. संयज कुटे हे २०१४ च्या मंत्रीमंडळात शेवटच्या चार महिन्यांसाठी कामगार कल्याण कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे यंदाच्या मंत्रीमंडळातही त्यांचे नाव पहिल्या यादीत असल्याचे सुत्रांकडून समजले आहे.
या विधानसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा प्रचंड मताधिक्यांनी विजयी झालेले आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे भाजपा स्टार प्रचारकांमधून एक आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचे स्टार प्रचारक यादीमध्ये नाव झळकले होते. याचबरोबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी फोडून पुन्हा महायुतीचे सरकार स्थापनेमध्ये आमदार डॉ. संजय कुटेंचीही महत्वाची भुमिका याठिकाणी दिसून आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू
आणि निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे. तसेच २०१४ च्या शेवटी चार महिन्यांकरीता त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्री पदी त्यांची नियुक्ति केली होती. त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचाही चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे यंदाच्या देवेंद्र फडणवीस ३.० पर्वाच्या कॅबिनेट मंडळाच्या पहिल्या यादीत आमदार डॉ. संजय कुटेंचे नाव असल्याची खात्रीलायक माहिती राजकिय वर्तुळांकडून प्राप्त झाली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्याला कॅबिनेट मंत्र्याचा बहुमान आमदार डॉ. संजय कुटेंच्या
माध्यमातून प्राप्त होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपा गोटात जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहेत.
डॉ. संजय कुटेंना क्रीडा व पशुसंवर्धन खाते मिळण्याची शक्यता !
■ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ३.० पर्वाला सुरूवात झाली आहे. ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर लगेच कॅबिनेटची बैठक घेतली असून यामध्ये जवळपास २० ते २२ भाजपाचे आमदार कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सुत्रांकडून समजले आहे. यामध्ये जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटेंचा सहभाग असून त्यांना राज्याच्या क्रिडा व पशुसंवर्धन खाते . किंवा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कडे राखून ठेवलेले जलसंपदा खाते
दिल्या जाणार असल्याचे समजले
जिल्ह्यात भाजपा गोटात आनंदाचे वातावरण
आमदार डॉ. संजय कुटेंचे नाव कॅबिनेट मंत्र्यांच्या पहिल्या यादीत आल्याची चर्चा राजकिय वर्तुळात जोरात सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी कॅबिनेट संभाव्य कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचे बोलल्या जात आहे.














